IND vs CAN: 1 ओपनर-1 बॉलर, टीम इंडियाचे 2 खेळाडू माघारी येणार! नक्की कारण काय?
Team India: टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे 2 खेळाडू हे माघारी परतणार असल्याचं म्हटलं जात आहे.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील साखळी फेरीतील अखेरचे काही सामने बाकी आहेत. एकूण 4 ग्रुपमधील 2 अव्वल संघ सुपर 8 साठी क्वालिफाय होणार आहेत. टीम इंडियाने आयर्लंड, पाकिस्तान आणि यूएसएला पराभूत करत सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडिया आता साखळी फेरीतील आपला अखेरचा सामना हा कॅनडा विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध कॅनडा हा सामना शनिवारी 15 जून रोजी होणार आहे. हा सामना फ्लोरिडा येथे होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया विंडिजला रवाना होईल.
टीम इंडिया विंडिजला रवाना होण्याआधी मॅनजमेंटने मोठा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. टीम मॅनेजमेंटने संघातील 2 खेळाडूंना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. टीम इंडियाच्या वर्ल्ड कपसाठीच्या मुख्य संघात एकूण 15 आणि राखीव म्हणून 4 खेळाडूंचा समावेश आहे. या राखीव पैकी 2 खेळाडूंना मायदेशी पाठवण्यात येणार आहे. मात्र याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया विरुद्ध कॅनडा सामन्यानंतर सलामी फलंदाज शुबम गिल आणि वेगवान गोलंदाज आवेश खान या दोघे भारतात परतणार आहेत. आवेश आणि शुबमन दोघेही सुपर 8 राउंडसाठी टीम इंडियासोबत नसतील. तर रिंकू सिंह आणि खलील अहमद हे दोघेही राखीव खेळाडू आहेत. मात्र हे दोघे टीम इंडियासोबत असतील.
ऐन क्षणी मुख्य संघातील खेळाडूला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागल्यास त्याच्या जागी राखीव खेळाडूचा समावेश केला जातो. मात्र साखळी फेरीत आतापर्यंत टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला दुखापत झालेली नाही. तसेच मुख्य संघात विकेटकीपर आणि ओपनर या जागांसाठी 2 खेळाडू आहेत. त्यामुळे सुपर 8 मध्ये अतिरिक्त राखीव खेळाडूंची गरज नसणार आहे. त्यामुळे आवेश आणि शुबमन या दोघांना पाठवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
कॅनडा क्रिकेट टीम: साद बिन जफर (कॅप्टन), आरोन जॉनसन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), डाइलन हेलिगर, दिलप्रीत बाजवा, ऋषीव जोशी, जेरेमी गॉर्डन, जुनैद सिद्दीकी, कलीम सना, कंवरपाल तथगुर, नवनीत धालीवाल, निकोलस किरटन, प्रगत सिंह, रविंद्रपाल सिंह आणि रेयानखान पठान.