बंगळुरु : बंगळुरुच्या मैदानात काल दोन टॉप क्लास इनिंग पहायला मिळाल्या. एक T 20 क्रिकेटमधील मावळता सूर्य विराट कोहली आणि दुसरा उगवता सूर्य शुभमन गिल. विराट कोहली काल जबरदस्त खेळला. त्याने सेंच्युरी झळकवली. पण त्याला पुन्हा टीम इंडियाच्या T 20 संघात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याचवेळी शुभमन गिलने भारताच भविष्य किती उज्वल आहे, ते दाखवून दिलं. दोघांनी कालच्या सामन्यात आपला सर्वोत्तम क्लास दाखवला.
विराटच्या 61 चेंडूतील नाबाद 101 धावांनी बँगलोरच्या विजयाची आस निर्माण केली. त्याचवेळी शुभमन गिलच्या 52 चेंडूतील नाबाद 104 धावांनी RCB चा टुर्नामेंटमधील प्रवास थांबवला.
फोर कमी आणि सिक्स जास्त
शुभमन गिलची कालच्या सामन्यातील बॅटिंग पाहिल्यानंतर जणू त्याने एमएस धोनीला ललकारलय. गिलचा इरादा एकदम स्पष्ट आहे, चेन्नईमध्ये मला रोखता आलं, तर रोखून दाखवा. शुभमन गिलने RCB विरुद्ध शतक झळकावलं, यात फोर कमी आणि सिक्स जास्त होते. शुभमनने 200 च्या स्ट्राइक रेटने बँगलोरच्या बॉलर्सना चोपलं. यात 8 सिक्स आणि 5 फोर होते. सीजनमधल त्याचं हे बॅक टू बॅक दुसरं शतक आहे. याआधी SRH विरुद्धच्या सामन्यात त्याने अशीच कमाल केली होती.
हे गिलला सुद्धा मान्य
IPL 2023 मध्ये शुभमन गिलची बॅटिंग एकदम वेगळी भासतेय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचा फॉर्म इथेही कायम आहे. IPL 2023 च्या दुसऱ्या हाफमध्ये शुभमन गिल जबरदस्त खेळतोय. हे गिलला सुद्धा मान्य आहे.
शुभमन गिल काय म्हणाला?
“आता मी माझ्या स्टार्टला मोठ्या स्कोरमध्ये बदलतोय. जे, मी IPL च्या पहिल्या हाफमध्ये करु शकलो नव्हतो. मी पहिल्या हाफमध्ये 40-50 धावा केल्या. पण या धावा मी मोठ्या स्कोरमध्ये बदलल्या नाहीत. IPL 2023 च्या दुसऱ्या हाफमध्ये मला हे शक्य होतय” असं शुभमन गिल म्हणाला.
त्याच कॉन्फिडन्सने धोनीला ललकारलं
IPL 2023 च्या दुसऱ्या हाफमध्ये शुभमन गिल अधिक घातक फॉर्ममध्ये येणं, ही गुजरात टायटन्ससाठी चांगली बाब आहे. स्वत:चा त्याचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. याच आत्मविश्वासाने त्याने आता एमएस धोनीला ललकारलय.
CSK विरुद्ध होणाऱ्या पहिल्या क्वालिफायर सामन्याआधी शुभमन गिल म्हणाला की, “चेन्नईमध्ये चेन्नई विरुद्ध खेळणं खूपच इंटरेस्टिंग असेल. आम्ही हा सामना जिंकून दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करु”
गुजरात टायटन्स बलस्थान काय?
गिल स्वत: चांगल्या फॉर्ममध्ये आहे. CSK साठी गिलचा फॉर्म हा धोक्याची घंटा आहे. बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही बाबतीस गुजरात टायटन्सची टीम बॅलन्स आहे. टॉप ऑर्डरमध्ये गिल, साहा आणि विजय शंकर सारखे फलंदाज आहेत. लोअर ऑर्डरमध्ये डेविड मिलर, राहुल तेवतिया आणि राशिद खान हे तीन फिनिशर आहे.