IND vs ENG | Shubman Gill चं शतक हुकलं, कारकीर्दीला मोठा डाग
Shubman Gill Run Out | इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचे 2 फलंदाज हे रन आऊट झाले. पहिल्या डावात रवींद्र जडेजा याच्या चुकीमुळे डेब्यूटंट सरफराज खान रन आऊट झाला. त्यानंतर आता शुबमन गिल दुर्देवी ठरला.
राजकोट | टीम इंडियाकडून इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात कुलदीप यादव आणि शुबमन गिल या जोडीने केली. टीम इंडियाकडे तिसऱ्या दिवसअखेर 322 धावांची आघाडी होती. कुलदीप-शुबमन जोडीने चौथ्या दिवसाची आश्वासक सुरुवात केली. या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. शुबमन गिल हा शतकाच्या उंबरठ्यावर पोहचला होता. मात्र तो दुर्देवी ठरला. शुबमन गिल नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला. शुबमन गिलचं शतक दुसऱ्यांदा 9 धावांनी हुकलं. तसेच शुबमनसोबत त्याच्या कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदाच असं घडलं.
टॉम हार्टली टीम इंडियाच्या दुसऱ्या डावातील 64 वी ओव्हर टाकत होता. हार्टलीच्या या ओव्हरमधील सहाव्या बॉलवर कुलदीपने फटका मारुन सिंगलसाठी धावला. मात्र बॉल बेन स्टोक्स याच्याकडे जाताना पाहून तो थांबला. तर कुलदीपच्या कॉलवर शुबमन धावत सुटला. मात्र कुलदीप धावून थांबल्यानंतर शुबमनला मागे जावं लागलं. जवळपास अर्ध्या वाटेतून शुबमनला मागे फिरावं लागलं.
तोवर दुसऱ्या बाजूला बेन स्टोक्स याने नॉन स्ट्राईक एंडवर टॉम हार्टलीच्या दिशेने अचूक थ्रो केला. शुबमन गिलने उडी मारुन क्रीझमध्ये पोहचण्याचा प्रयत्न केला. मात्र स्टोक्सच्या अचूक थ्रोमुळे शुबमन रन आऊट झाला. शुबमनचं शतक हुकल्याने त्याने मैदानातच संताप व्यक्त केला. शुबमनने मैदानात बॅट झटकून आपला राग व्यक्त केला. तसेच दोघांपैकी कुणाच्या चुकीमुळे शुबमनला माघारी जावं लागलं? अशी चर्चाही सुरु झाली.
शुबमन गिल रन आऊट
A heart-breaking run-out for Shubman Gill….!!!!pic.twitter.com/GoFZ3OEeOl
— Johns. (@CricCrazyJohns) February 18, 2024
शुबमनसोबत 3 वर्षात पुन्हा तसंच घडलं
शुबमन रन आऊट झाल्याने त्याच्या कसोटी कारकीर्दीला डाग लागला. शुबमन पहिल्यांदाच रन आऊट झाला.तसेच 2021 नंतर तो आता पुन्हा 91 धावांवर आऊट झाला. शुबमन याआधी बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावातही 91 धावांवर आऊट झाला होता.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.