सचिन ते शुबमन, वनडे क्रिकेटमध्ये डबल सेंच्युरी करणारे एकूण 5 भारतीय फलंदाज

एकदिवसीय क्रिकेट विश्वात आतापर्यंत एकूण 10 द्विशतक झळकावण्यात आली आहेत. 10 पैकी 7 द्विशतकं ही टीम इंडियाच्या 5 फलंदाजांनीच ठोकली आहेत.

सचिन ते शुबमन, वनडे क्रिकेटमध्ये डबल सेंच्युरी करणारे एकूण 5 भारतीय फलंदाज
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 11:46 PM

हैदराबाद : शुबमन गिल याने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडेत धमाका केला. शुबमनने द्विशतक ठोकलं. यासह शुबमनची क्रिकेट विश्वात एकच चर्चा झाली. शुबमन यासह वनडेत द्विशतक करणारा एकूण आठवा तर पाचवा भारतीय फलंदाज ठरला. 300 बॉलच्या सामन्यात द्विशतक करणं म्हणजे तसं आव्हानात्मक. पण हे अशक्य ही शक्य करुन दाखवायची सुरुवातही टीम इंडियाच्या खेळाडूंनीच करुन दाखवली.

सर्वात आधी सचिन तेंडुलकर याने 13 वर्षांपूर्वी 2010 साली दक्षिण आफ्रिका विरुद्ध एकदिवसीय द्विशतक ठोकलं. क्रिकेटला सुरुवात झाल्यापासून आंतरराष्ट्रीय सामन्यातलं ते पहिल द्विशतक होतं. त्यानंतरच्या 13 वर्षातच एकूण 10 वेळा द्विशतकं झाली. त्यापैकी 7 वेळा द्विशतकं करणारे खेळाडू भारतीयच ठरले.

दुहेरी शतकं झळकवण्यात भारतीय फलंदाजांचा डंका जगभर गाजतोय. एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या इतिहासात आतापर्यंत 8 फलंदाजांनाच दुहेरी शतकं करता आलीयत. त्यात तब्बल 5 खेळाडू भारतीय आहेत.

हे सुद्धा वाचा

क्रिकेट इतिहासात पहिल्यांदा 2010 साली सचिननं एकदिवसीय सामन्यानं शतक झळकावलं. दक्षिण आफ्रिकेविरोधात 147 चेंडूत 25 चौकार आणि 3 षटकार ठोकत सचिननं नाबाद 200 धावा केल्या. त्याच्या दुसऱ्याच वर्षी वीरेंद्र सेहवागनं वेस्टइंडिज विरोधात 149 चेंडूत 219 रन केले.

रोहित शर्मानं 2013 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध 209 रन केले. रोहित शर्मानंच 2014 ला पुन्हा श्रीलंकेविरोधात तब्बल 264 धावा काढल्या. जो आजपर्यंत एकदिवसीय मालिकेतला हायस्कोर आहे. मार्टिन गप्टिलनं 2015 ला नाबाद 237 धावा केल्या. ख्रिस गेलनं 2015 ला झिंबाब्वे विरुद्ध 215 रन काढले.

रोहित शर्मानं 2017 मध्ये पुन्हा श्रीलंका विरुद्ध तिसरं द्विशतक केलं. फखर जमाननं 2018 ला झिंबाब्वे विरुद्ध द्विशतक केलं. इशान किशननं बांगलादेश विरुद्ध 2022 मध्ये 210 धावा केल्या. त्यानंतर आता शुबमन गिलने 2023 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध शुभमन गिलनं 208 रन काढल्या.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.