Shubman Gill | रोहितनंतर शुबमनचा तडाखा, इंग्लंड विरुद्ध खणखणीत शतक

Shubman Gill Century | शुबमन गिल याने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत आपला तडाखा सुरुच ठेवलाय. शुबमनने पाचव्या कसोटीत या मालिकेतील दुसरं शतक झळकावलं आहे.

Shubman Gill | रोहितनंतर शुबमनचा तडाखा, इंग्लंड विरुद्ध खणखणीत शतक
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 12:17 PM

धर्मशाला | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्यानंतर युवा फलंदाज शुबमन गिल यानेही इंग्लंड विरुद्ध पाचव्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी खणखणीत शतक ठोकलंय. शुबमन गिल याने 137 बॉलमध्ये शतकी टप्पा गाठला. शुबमनच्या या शतकात 10 चौकार आणि 5 सिक्सचा समावेश होता. शुबमनने 72.99 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. शुबमनने शोएब बशीर याच्या दुसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्याच बॉलवर चौकार ठोकून हे चौथं शतक पूर्ण केलं. शुबमनच्या कसोटी कारकीर्दीतील हे एकूण चौथं आणि इंग्लंड विरुद्धचं दुसरं शतक ठरलं. शुबमनने याआधी विशाखापट्टणममध्ये इंग्लंड विरुद्धचं पहिलंवहिलं शतक केलं होतं.

शुबमन गिल याला राजकोटमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीतही शतक करण्याची संधी होती. मात्र शुबमन नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला होता. शुबमनचं शतक हे अवघ्या 9 धावांनी हुकलं होतं. शुबमनने तेव्हा 91 धावा करुन आऊट झाला होता. तर त्यानंतर शुबमनने रांचीत दुसऱ्या डावात नाबाद अर्धशतक ठोकलं होतं. शुबमनने इंग्लंड विरुद्ध अशाप्रकारे तिसऱ्या स्थानी खेळत या मालिकेत 2 अर्धशतकं आणि 2 शतकं ठोकली. शुबमनने या मालिकेत आतापर्यंत 400 धावांचा टप्पा पार केलाय.

हे सुद्धा वाचा

रोहितचं अर्धशतक

शुबमन गिल याच्याआधी हिटमॅन रोहित शर्मा याने शतक झळकावलं. रोहित शर्माच्या कसोटी कारकीर्दीतील हे 12 वं शतक ठरलं. रोहितने 154 बॉलमध्ये 64.94 च्या स्ट्राईक रेटने शतक पूर्ण केलं. रोहितच्या या शतकात 3 सिक्स आणि 13 चौकारांचा समावेश होता. दरम्यान दुसऱ्या डावातील पहिलं सत्र टीम इंडियाच्या नावावर राहिलं. रोहित आणि यशस्वी या जोडीने 30 ओव्हरमध्ये टीम इंडियासाठी 129 धावा जोडल्या आणि इंग्लंडला आणखी बॅकफुटवर ढकललं. टीम इंडियाने यासह लंचपर्यंत 46 धावांची आघाडी घेतली.

रोहित-शुबमनचं शतकी जल्लोष

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.