Icc Odi Ranking | शुबमन गिल जगात नंबर 1 बॅट्समन, बाबर आझमला पछाडला
ICC Odi Batting Rankings | भारतीय क्रिकेट संघांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या युवा शुबमन गिल पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला मागे टाकत जगात भारी ठरला आहे.
मुंबई | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आपली विजयी घोडदौड कायम राखत सलग 8 विजय मिळवले आहेत. टीम इंडियाने सेमी फायनलसाठीही क्वालिफाय केलं आहे. टीम इंडियाने या 13 वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्मा याच्या नेतृत्वा धमाकेदार कामगिरी केली. टीम इंडिया आता या स्पर्धेतील साखळी फेरीतील आपला अखेरचा सामना हा रविवारी 12 नोव्हेंबर रोजी नेदरलँड्स विरुद्ध खेळणार आहे. त्याआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
टीम इंडियाचा युवा आणि डॅशिंग फलंदाज शुबमन गिल याने आयसीसी वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 स्थान पटकावलं आहे. शुबमनने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला मागे टाकत सिंहासनावर विराजमान झाला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. शुबमन गिल याने 5 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध 23 आणि 2 नोव्हेंबर रोजी श्रीलंका विरुद्ध 92 धावांची खेळी केली होती. शुबमन या खेळीच्या जोरावर बाबर आझम याला मागे टाकण्यात यशस्वी ठरला.
याआधीच्या आयसीसी वनडे रँकिंगमध्ये बाबर आझम आणि शुबमन गिल या दोघांमध्ये अवघ्या 2 पॉइंट्सचा फरक होता. गिलने श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध तडाखेदार फलंदाज करुन 2 पॉइंट्स भरुन आणि बाबर आझमला मागे टाकण्यात यश मिळवलं. ताज्या आकडेवारीनुसार, शुबमन गिल आणि बाबर आझम या दोघांमध्ये आता 6 पॉइंट्सचा फरक आहे. शुबमनच्या नावावर आता 830 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. तर बाबरच्या खात्यात 824 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.
विराट-रोहित टॉप 10 मध्ये
या बॅट्समन रँकिंगमध्ये टीम इंडियाचा विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही टॉप 10 मध्ये आहेत. विराट कोहली चौथ्या आणि रोहित शर्मा स्थानावर आहे. विराटच्या नावावर 770 आणि रोहितच्या नावावर 739 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.
शुबमन गिल नंबर 1
A big day for India’s #CWC23 stars with two new No.1 players crowned in the latest @MRFWorldwide ICC Men’s ODI Player Rankings 😲
Details 👇https://t.co/nRyTqAP48u
— ICC (@ICC) November 8, 2023
श्रेयसची अय्यरची लाँग जंप
टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरमधील खंदा कार्यकर्ता फलंदाज श्रेयस अय्यर याने बॅटिंग रँकिंगमध्ये गरुडझेप घेतली आहे. श्रेयसने थेट 17 स्थांनांची मोठी झेप घेत 18 व्या क्रमांकावर पोहचला आहे. श्रेयसने श्रीलंका विरुद्ध 82 आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध 77 धावांची तोडू खेळी केली होती. श्रेयसला या खेळीचाच फायदा रँकिंगमध्ये झाला.