Asia Cup 2023 : नवा आहे पण छावाय, Yo-Yo Test मध्ये किंग कोहलीला ‘या’ युवा खेळाडूने टाकलं मागे!

Team India Players Yo-Yo Test : आशिया कपआधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी यो-यो टेस्ट दिली यामध्ये सर्वजण पास झालेत. युवा खेळाडूने टॉप मारला असून त्याने किंग कोहलीलाही मागे टाकलं आहे.

Asia Cup 2023 : नवा आहे पण छावाय, Yo-Yo Test मध्ये किंग कोहलीला 'या' युवा खेळाडूने टाकलं मागे!
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 12:52 PM

मुंबई : आशिया कप 2023 सुरू व्हायला चार दिवस बाकी असून सर्व संघांनी आपल्या संघांची घोषणा केलीये.  दुखापतीतून सावरत टीम इंडियामध्ये अनेक खेळाडूंनी कमबॅक केलं आहे मात्र मैदानात हे खेळाडु कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. आशिया कप सुरू होण्याआधी यो-यो टेस्ट घेण्यात आली असून यामध्ये एका युवा खेळाडूने किंग कोहलीला पछाडल्याची माहिती समोर आली आहे. विराट कोहली याने यो-यो टेस्टमध्ये मिळवलेला स्कोर पोस्ट करत सांगितला होता. परंतु संघातील युवा असलेल्या खेळाडूने त्याच्यापेक्षा जास्त स्कोर केलाय.

विराट कोहलीचा यो-यो टेस्टमधील स्कोर-

टीम इंडियामधील फिट खेळाडूंमध्ये विराट कोहलीसुद्धा असून कोहली फिटनेसवर खूप मेहनत घेतो. वयाच्या 34 व्या वर्षी विराटनो यो-यो टेस्ट सहज पार केलीये. विराटने पोस्ट केलेल्या स्टोरीमध्ये त्याने टेस्टमध्ये 17.2 स्कोर केला होता. हा स्कोर तुम्ही यो-यो टेस्टमध्ये पात्र होण्यासाठी पर्फेक्ट आहे. कोहली अनेकदा त्याचे जिममधील व्यायाम करतानाचे व्हिडीओ पोस्ट करतो.

किंग कोहलीला कोणी मागे टाकलं?

विराट कोहलीला नव्या दमाच्या खेळाडूने मागे टाकलं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसुन शुबमन गिल आहे. शुबमन गिल 18.7 स्कोर करत टॉपर राहिला, त्याने विराटलाच नाहीतर टीममधील सर्वांना मागे टाकत  सर्वाधिक 18.7 स्कोर केला.

यो-यो टेस्ट पात्रतेसाठी लागतो इतका स्कोर

यो-यो टेस्ट पास होण्यासाठी कमीत कमी 16.5 स्कोर करावा लागतो. टीम इंडियाचे सर्व खेळाडू ही टेस्ट पास करण्यास यशस्वी ठरले. याआधी टीम इंडियाच्या काही खेळाडूंना हा टास्क पूर्ण करता आला नाही. मोहम्मद शमी, संजू सॅमसन, युवराज सिंग, अंबाती रायडू आणि सुरेश रैना हे खेळाडूसुद्धा यो-यो टेस्टमध्ये फेल गेले होते.

आशिया कप 2023 साठी भारतीय संघ-:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.