Video : सिराज इंग्रजी बोलताना अडचणीत! बुमराहने चुटकीसरशी धरला बूम आणि केलं असं काम
क्रिकेटच्या मैदानात उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना इंग्रजी बोलताना अडचणींचा सामना करावा लागतो. असे बरेच खेळाडू आहेत त्यांना इंग्रजी बोलताना अडचण येते. पण याबाबत न्यूनगंड न बाळगता जे येतं तसं बोलण्याचा प्रयत्न असतो. असंच काहीसं सिराजच्या बाबतीत झालं. पण बुमराह त्याच्या मदतीला उभा राहीला.
मुंबई : दक्षिण अफ्रिकेत खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत भारताने जबरदस्त कामगिरी केली. दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली. महेंद्रसिंह धोनीनंतर 13 वर्षांनी अशी कामगिरी रोहित शर्माच्या नेतृत्वात झाली. दुसरा कसोटी सामना भारताने 7 गडी राखून जिंकला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं. अवघ्या दीड दिवसात सामन्याचा निकाल लागला. भारताच्या मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या जोडीने दक्षिण अफ्रिकन फलंदाजांना सळो की पळो करू सोडलं. सिराजने पहिल्या डावात सहा गडी बाद केले होते. त्याची कसोटीतील सर्वोत्तम खेळी होती. तर दुसऱ्या डावात एक गडी बाद करण्यात यश आलं. मोहम्मद सिराजने एकूण 7 गडी टिपले. यासाठी त्यााल सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. सामन्यानंतर समालोचकांनी दोघांशी संवाद साधला.
सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर सिराज प्रेजेंटरच्या जवळ इंटरव्यूसाठी आला. तेव्हा जसप्रीत बुमराहही त्याच्या जवळ गेला. खरं तर सिराजला इंग्रजी बोलताना अडचण येते याची कल्पना होती. त्यामुळे तो जे काही हिंदीत बोलेल ते ट्रान्सलेट करण्यासाठी बुमराह पुढे आला होता. प्रेजेंटरने सिराजला प्रश्न विचारताच हिंदीत बोलेल अशी बुमराहला अपेक्षा होती. पण सिराजने न घाबरता इंग्रजीत बोलण्यास सुरुवात केली. सिराजला असं बोलताना पाहून बुमराह आश्चर्यचकीत झाला. उत्तर संपल्यानंतर बुमराहने सिराजकडे पाहिलं आणि इशाऱ्यात सांगितलं की मला का बोलवलं? यावर प्रेजेंटर आणि सिराज दोघंही हसू लागले. त्यानंतर विचारलेल्या प्रश्नाला सिराजने हिंदीत उत्तर दिलं आणि मग बुमराहने ट्रान्सलेट केलं.
These 2 have bowled our hearts over! ❤️❤️#MohammadSiraj & #JaspritBumrah showed why they make the perfect jodi on and off the field in this post-match interview, after their contributions gave #TeamIndia a historic series-levelling victory at Cape Town.#Cricket #SAvIND pic.twitter.com/FX6G89Flqm
— Star Sports (@StarSportsIndia) January 4, 2024
दक्षिण अफ्रिकेला दुसऱ्या सामन्यात पराभूत केल्याने टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये फायदा झाला आहे. भारताने गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. आता मायदेशात इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका 5-0 किंवा 4-0 ने जिंकली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा प्रवास सोपा होईल. आता दोन्ही खेळाडूंकडून या मालिकेत बऱ्याच अपेक्षा आहेत. पण भारतीय खेळपट्ट्या या फिरकीपटूंना मदत करणाऱ्या आहेत, हे देखीत तितकंच खरं आहे.