SL A VS PAK A : श्रीलंकेची फायनलमध्ये धडक, पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय, अंतिम फेरीत टीम इंडियाचं आव्हान?
Sri Lanka A vs Pakistan A Semi Final : श्रीलंकेने शेजारी पाकिस्तानचा धुव्वा 7 विकेट्सने धुव्वा उडवत एमर्जिंग आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
एमर्जिंग आशिया कप 2024 स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात श्रीलंका ए ने विजय मिळवला आहे. श्रीलंकेने पाकिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. पाकिस्तानने श्रीलंकेला विजयासाठी 136 धावांचं आव्हान दिलं होतं. श्रीलंकेने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात 21 बॉलआधी पूर्ण केलं. लंकेने 16.3 ओव्हरमध्ये विजयी आव्हान गाठलं. आता श्रीलंकेसमोर अंतिम फेरीत कुणाचं आव्हान असणार? हे थोड्याच वेळाच स्पष्ट होणार आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने आहेत. या दोघांमधील विजयी संघ आशिया चॅम्पियन होण्यासाठी श्रीलंकेविरुद्ध भिडणार आहे.
श्रीलंकेची बॅटिंग
श्रीलंकेसाठी अहान विक्रमसिंघे याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर विकेटकीपर लहिरु उदारा यानेही चांगली खेळी केली. अहानने 52 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर लहिरूने 20 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 2 फोरसह विस्फोटक 43 रन्स केल्या. यशोधा लंका याला त्याच्या चुकीमुळे 11 धावांवर असताना मैदानाबाहेर जावं लागलं. तर कॅप्टन निवानिडू फर्नांडो याने 9 धावांचं योगदान दिलं. तर सहान अरचिगे नाबाद 17 धावा करुन परतला. पाकिस्तानकडून सुफीयान मुकीम आणि अब्बास अफ्रिदी या दोघांना 1-1 विकेट मिळाली.
दरम्यान त्याआधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय केला. मात्र पाकिस्तानला उंपात्य फेरीप्रमाणे गेम करता आला नाही. पाकिस्तानला 9 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 135 धावांपर्यंतच पोहचता आलं. पाकिस्तानकडून फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. ओपनर ओमेर युसूफ याने सर्वाधिक 68 धावांचं योगदान दिलं. तर हैदर अली, मोहम्मद इम्रान आणि अरफात मिन्हास या तिघांनी अनुक्रमे 14, 14 आणि 10 धावांचं योगदान दिलं. तर इतरांनी श्रीलंकेसमोर गुडघे टेकले. श्रीलंकाकडून दुशान हेमंथा याने चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर निपुण रंसिका आणि एशान मलिंगा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
श्रीलंका फायनलमध्ये
Sri Lanka ‘A’ bowlers were on fire, restricting Pakistan ‘A’ to a modest 135 runs. 💥 Time to chase this down and secure our spot in the Men’s T20 Emerging Teams Asia Cup final! 👊 #SLvWI pic.twitter.com/E0MZP9XTRi
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 25, 2024
श्रीलंका ए प्लेइंग इलेव्हन : नुवानिडू फर्नांडो (कर्णधार), यशोधा लंका, लाहिरू उदारा (विकेटकीपर), सहान अरचिगे, पवन रथनायके, रमेश मेंडिस, अहान विक्रमसिंघे, दुशान हेमंथा, निमेश विमुक्ती, निपुण रंसिका आणि एशान मलिंगा.
पाकिस्तान ए प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद हरिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), ओमेर युसूफ, यासिर खान, कासिम अक्रम, अब्दुल समद, हैदर अली, अराफत मिन्हास, सुफियान मुकीम, अब्बास आफ्रिदी, शाहनवाज दहनी आणि मोहम्मद इम्रान.