Odi Debut | 3 दिवसांआधी चेन्नईला IPL ट्रॉफी जिंकून दिली, आता थेट टीमकडून पदार्पण
चेन्नई सुपर किंग्स टीमने 30 मे रोजी आयपीएल 16 व्या मोसमाचं विजेतेपट पटकावलं. त्यानंतर आज चेन्नईच्या आणि धोनीच्या लाडक्या खेळाडूने टीमसाठी पदार्पण केलंय.
कोलंबो | चेन्नई सुपर किंग्स टीम आयपीएल 16 व्या मोसमातील चॅम्पियन ठरली. चेन्नईने गुजरात टायटन्स टीमवर शेवटच्या बॉलवर चौकार ठोकत थरारक विजय मिळवला. चेन्नईने या विजयासह मुंबई इंडियन्सनच्या सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. आता चेन्नई आणि मुंबई इंडियन्स संयुक्तपणे सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकणारे संघ ठरले आहेत. चेन्नईला चॅम्पियन करण्यात टीममधील प्रत्येक खेळाडूची भूमिका निर्णायक ठरली. एका खेळाडूंचं तर नशिबच फळफळलं. चेन्नईने ट्रॉफी जिंकून 3 दिवस होताच या पठ्ठ्याची टीममध्ये निवड झाली आणि पदार्पणाचीही संधी मिळाली.
महेंद्रसिंह धोनी याच्या या लाडक्या खेळाडूने खरंच कमाल केली. वयाच्या अवघ्या 21 वर्षी या पठ्ठ्याने आपल्या टीमसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशांचं प्रतिनिधित्व केलंय. युवा आणि प्रतिभावान गोलंदाज मथीशा पथीराना याने अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून श्रीलंकेसाठी एकदिवसीय पदार्पण केलं आहे.
श्रीलंका कॅप्टन दासून शनाका याने मथीशा याला कॅप देत टीममध्ये स्वागत केलं. यावेळेस मथीशाचं संघ सहकाऱ्यांनी अभिनंदन केलं. मथीशा व्यतिरिक्त दुशन हेमंथा यानेही श्रीलंकेकडून आपलं पदार्पण केलंय.
?? Exciting moment for Matheesha Pathirana as he receives his One Day International cap from skipper Dasun Shanaka! ?#SLvAFG pic.twitter.com/2EaBAXYwzC
— Sri Lanka Cricket ?? (@OfficialSLC) June 2, 2023
मथीशा पथिराना याची 16 व्या मोसमातील कामगिरी
मथीशा पथिराना याने आयपीएल 16 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्स टीमसाठी उल्लेखनीय आणि चमकदार कामगिरी केली. मथीशाने या एकूण 16 व्या मोसमातील 12 सामन्यांमध्ये 19 विकेट्स घेतल्या. मथीशाने चेन्नईच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
मथीशा याच्याकडे श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा याचा क्रिकेटमधील वारसदार म्हणून पाहिलं जातंय. दोघांची बॉलिंग एक्शन जवळपास सारखी आहे. त्यामुळे मथीशा याला बेबी मलिंगा असंही म्हटलं जातं. त्यामुळे आता मथीशा कशाप्रकारे अपफगाणिस्तान विरुद्ध आपल्या टीमसाठी कामगिरी करतो, याकडे विशेष करुन चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायजीचं लक्ष असणार आहे.
अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन | हशमतुल्लाह शाहीदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी आणि फरीद अहमद मलिक.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन | दासुन शनाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (wk), अँजेलो मॅथ्यूज, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुशान हेमंथा, कसून राजिथा, मथीशा पाथिराना आणि लाहिरु कुमारा.