Chennai Super Kings | चेन्नईला ट्रॉफी जिंकून देताच थेट टीममध्ये निवड, ‘या’ दोघांना लॉटरी
चेन्नई सुपर किंग्स टीमच्या दोन खेळाडूंना लॉटरी लागली आहे. आयपीएल 2023 जिंकल्यानंतर या जोडीची थेट टीममध्ये निवड झाली आहे. जाणून घ्या ते दोघे कोण आहेत?
मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमाची सांगता झालीय. चेन्नई सुपर किंग्स गुजरात टायटन्स टीमवर मात करत पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं. आता यानंतर सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलकडे लागून राहिलंय. या टेस्ट वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे. या महाअंतिम सामन्याला लंडमधील द केनिंग्टन ओव्हलमध्ये 7 ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर काहीही गडबड झाल्याल खेळ वाया जाऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून 12 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
आयपीएल 16 वा मोसम संपल्यानंतर टप्प्याटप्याने टीम इंडियाचे खेळाडू हे लंडनला रवाना झाले. टीम इंडियाची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळण्याची एकूण आणि सलग दुसरी वेळ आहे. टीम इंडियाला पहिल्यांदा 2021 मध्ये अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे आता टीम इंडिया दुसऱ्या प्रयत्नात चॅम्पियन होण्यासाठी जीव ओतून सराव करत आहे.
तर दुसऱ्या बाजूला चेन्नईला आयपीएल जिंकून दिल्यानंतर 2 युवा खेळाडूंची टीममध्ये निवड झाली आहे. अफगाणिस्तान जून महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या 16 जणांमध्ये आयपीएल 16 व्या मोसमात चेन्नईसाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या दोघांना संधी दिली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना आणि ऑफ स्पिनर महीष तीक्षणा या दोघांना संधी दिली आहे. दोघांनी आयपीएल 2023 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.
श्रीलंका संघ जाहीर
? SQUAD ANNOUNCEMENT ?
Sri Lanka have named 16-member ODI squad for the first two games of the ODI series vs. Afghanistan, starting on 2nd June! ? #SLvAFG pic.twitter.com/EOx2ioyLgw
— Sri Lanka Cricket ?? (@OfficialSLC) May 30, 2023
पथिराना या वनडे सीरिजमधून पदार्पण करु शकतो. तसेच माजी कर्णधार दिमुथ करुणारत्ने याचं टीममध्ये कमबॅक झालं आहे. दिमुख अखेरचा वनडे सामना हा 2021 मध्ये खेळला होता. दिमुथने 2019 मध्ये श्रीलंकेचं वर्ल्ड कपमध्ये नेतृत्व केलं होतं. दरम्यान हे तिन्ही सामने महिंगा राजपक्षा आंतरराष्ट्रीय स्टेडियम हंबनटोटा इथे खेळवण्यात येणार आहेत.
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका वेळापत्रक
शुक्रवार 2 जून , पहिली वनडे, सकाळी 10 वाजता.
रविवार 4 जून, दुसरी वनडे, सकाळी 10 वाजता.
बुधवार 7 जून, तिसरी वनडे, सकाळी 10 वाजता.
अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम श्रीलंका | दासून शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (विकेटकीपर), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चारिथ असालंका, सदीरा समरविक्रमा, चमिका करुणारत्ने, दुशान हेमंथा, वानिंदु हसरंगा, लहिरु कुमारा दुष्मंथा चमिरा, कसून राजिथा, मथिशा पथिराना आणि महीष तीक्षणा
श्रीलंका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अफगाणिस्तान टीम | हशमतुल्लाह शाहिदी (कप्तान), रहमत शाह, रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखेल, अजमतुल्लाह ओमारजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, अब्दुल रहमान, फजलहक फारुकी आणि फरीद अहमद मलिक.