SL vs AFG | श्रीलंकेचा अफगाणिस्तान विरुद्ध धमाका, अशी कामगिरी करणारी दुसरीच टीम

| Updated on: Feb 02, 2024 | 4:43 PM

Sri Lanka vs Afghanistan Only Test | श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात श्रीलंकेने इतिहास रचला आहे. श्रीलंकेने नक्की काय केलं? जाणून घ्या

SL vs AFG | श्रीलंकेचा अफगाणिस्तान विरुद्ध धमाका, अशी कामगिरी करणारी दुसरीच टीम
Follow us on

मुंबई | क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा 2 फेब्रुवारी दिवस खास आहे. आजपासून 2 कसोटी सामन्यांना सुरुवात झाली आहे. विशाखापट्टणम येथे टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येत आहे.

श्रीलंकेने अफगाणिस्तान विरुद्ध टॉस जिंकला. श्रीलंकेने अफगाणिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. यासह श्रीलंकेने इतिहास रचला. श्रीलंका सर्व संघांविरुद्ध कसोटी सामने खेळणारे दुसरी टीम ठरली आहे. याआधी बांगलादेश क्रिकेट टीमने अशी कामगिरी करण्याचा बहुमान मिळवला होता. अफगाणिस्ताचा आपला पहिला कसोटी सामना 2018 साली पहिला कसोटी सामना हा टीम इंडिया विरुद्ध खेळला होता. अफगाणिस्तानचा श्रीलंका विरुद्धचा कसोटी क्रिकेटमधील आठवा सामना आहे.

एसीबीचे अध्यक्ष यांची प्रतिक्रिया

अफगाणिस्तानचा हा श्रीलंके विरुद्धचा पहिला कसोटी सामना आहे. याबाबत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मीरवाईज अशरफ यांनी प्रतिक्रिया दिली. “श्रीलंके विरुद्ध पहिलीवहिला कसोटी सामना खेळण्याचा अनुभव सुखद आहे. श्रीलंकेचा कसोटी क्रिकेट खेळण्याचा समृद्ध असा इतिहास आहे.”, असं मीरवाईज म्हणाले.

सामन्याबाबत थोडक्यात

दरम्यान अफगाणिस्तानचा पहिला डाव पहिल्याच दिवशी आटोपला आहे. अफगाणिस्तानने पहिल्या डावात ऑलआऊट 62.4 ओव्हरमध्ये 198 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून रहमत शाहलयाने सर्वाधिक 91 धावा केल्या. तर विशव फर्नांडो याने 4 विकेट्स घेतल्या. असिथा फर्नांडो आणि प्रभाथ जयसूर्या या दोघांना 2-2 विकेट्स घेण्यात यश आलं.

अफगाणिस्तानचं पॅकअप

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), इब्राहिम झद्रान, नूर अली जादरान, रहमत शाह, नासिर जमाल, इकराम अलीखिल (विकेटकीपर), जिया-उर-रहमान, कैस अहमद, निजात मसूद, मोहम्मद सलीम सफी आणि नवीद झद्रान.

श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | धनंजय डिसिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, एंजेलो मैथ्यूज, दिनेश चांदीमल, सदीरा समरविक्रमा (विकेटकीपर), चमिका गुणसेकरा, प्रभात जयसूर्या, विश्व फर्नांडो आणि असिथ फर्नांडो.