SL vs AUS : पहिली कसोटी, पहिला दिवस आणि पहिली धाव, स्टीव्हन स्मिथचा महारेकॉर्ड, झटक्यात 5 जणांना पछाडलं
Steven Smith Milestone : ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्हन स्मिथ याने गॉलमध्ये इतिहास घडवला आहे. स्मिथने 1 धाव घेत 5 दिग्गज फलंदाजांना मागे टाकलं आहे.
![SL vs AUS : पहिली कसोटी, पहिला दिवस आणि पहिली धाव, स्टीव्हन स्मिथचा महारेकॉर्ड, झटक्यात 5 जणांना पछाडलं SL vs AUS : पहिली कसोटी, पहिला दिवस आणि पहिली धाव, स्टीव्हन स्मिथचा महारेकॉर्ड, झटक्यात 5 जणांना पछाडलं](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/steven-smith-10-thounsand-test-runs.jpg?w=1280)
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्हन स्मिथ याने श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी पहिली धाव घेत इतिहास घडवला आहे. श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना हा गॉल इथे खेळवण्यात येत आहे.ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. ट्रेव्हिस हेड आणि उस्मान ख्वाजा या सलामी जोडीने अप्रतिम सुरुवात केली. दोघांनी 14 ओव्हरमध्ये 91 धावा जोडल्या. त्यानंतर ट्रेव्हिस हेड अर्धशतक करुन माघारी परतला. ऑस्ट्रेलियाला 15 व्या ओ्व्हरमध्ये दुसरा झटका लागला. मार्नस लबुशेन 20 धावा करुन माघारी परतला. लबुशेननंतर स्टीव्हन स्मिथ मैदानात आला. स्मिथने पहिली धाव घेतली आणि भीमपराक्रम केला.
स्टीव्हन स्मिथने प्रभात जयसूर्याच्या बॉलवर 1 धाव घेतली. स्टीव्हनने यासह कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या. स्टीव्हन स्मिथ याने यासह इतिहास घडवला. स्टीव्हन 10 हजार कसोटी धावा करणारा एकूण 15 वा फलंदाज ठरला. तसेच स्टीव्हन ऑस्ट्रेलियासाठी अशी कामगिरी करणारा चौथा फलंदाज ठरला. तसेच स्टीव्हनने ऑस्ट्रेलियासाठी वेगवान 10 हजार धावा करण्याचा बहुमानही मिळवला. स्टीव्हनने 115 व्या सामन्यातील 205 व्या डावात ही कामगिरी केली. स्टीव्हनने यासह एक-दोन नाही तर 5 जणांना पछाडलं.
स्टीव्हन स्मिथ वेगवान 10 हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. स्टीव्हनने श्रीलंकेच्या कुमार संगकारा याच्या विक्रमाची बरोबरी केलीय. संगकारानेही 115 सामन्यांमध्ये 10000 हजार धावा केल्या होत्या. तसेच वेगवान 10 हजार धावांचा विक्रम ब्रायन लारा याच्या नावावर आहे.
स्टीव्हने 5 जणांना पछाडलं
स्टीव्हनने या कामगिरीसह 5 दिग्गज फलंदाजांना मागे टाकलं. या 5 फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, जो रुट, रिकी पॉन्टिंग आणि यूनिस खान यांचा समावेश आहे.
कसोटीत सामनेनिहाय वेगवान 10 हजार धावा
- ब्रायन लारा : 111 सामने
- कुमार संगकारा : 115 सामने
- स्टीव्हन स्मिथ : 115 सामने
- यूनिस खान : 116 सामने
- रिकी पॉन्टिंग : 118 सामने
- जो रुट : 118 सामने
- राहुल द्रविड :120 सामने
- सचिन तेंडुलकर : 122 सामने
दस हजारी स्टीव्हन
An exclusive club welcomes another member 👏
Well played, Steve Smith 🏏
More ➡️ https://t.co/t44tcMDKZX pic.twitter.com/dJRoa6n0FL
— ICC (@ICC) January 29, 2025
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: धनंजय डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, ओशादा फर्नांडो, दिनेश चांदीमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडिस (विकेटकीपर), प्रभात जयसूर्या, निशान पेरिस, जेफ्री वँडरसे आणि असिता फर्नांडो.
ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग इलेव्हन: स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, मॅथ्यू कुहनेमन, नॅथन लायन आणि टॉड मर्फी.