Test Cricket : बीजीटीनंतर आता 2 कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर, एकूण 16 खेळाडूंना संधी
Test Series : बॉर्डर गावसकर 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा 3-1 असा निकाल लागला. त्यानंतर आता 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम बॉर्डर गावसकर ट्रॉफीनंतर आता श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. कांगारु श्रीलंका दौऱ्यात कसोटी मालिका खेळणार आहे. श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. निवड समितीने एकूण 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून सोशल मीडियावरुन प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतती माहिती दिली आहे. या मालिकेतील दोन्ही सामने हे गाले क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहेत. तसेच 29 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान ही मालिका पार पडणार आहे.
5 जणांना संधी
ऑस्ट्रेलियाने या मालिकेसाठी टीम इंडियाविरुद्ध पदार्पण करणाऱ्या 5 जणांना संधी दिली आहे. तसेच या मालिकेत अनुभवी फलंदाज स्टीव्हन स्मिथ याला नेतृत्वाची संधी दिली आहे. पॅट कमिन्स याने विश्रांती घेतल्याने स्मिथला हा जबाबदारी देण्यात आली आहे.
3 पदार्पणवीरांना संधी
टीम इंडियाविरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी पदार्पण करणाऱ्या तिघांना श्रीलंका दौऱ्यासाठी संधी मिळाली आहे. या तिघांमध्ये सॅम कॉनस्टास, नॅथन मॅकस्विनी आणि ब्यू वेबस्टर याचा समावेश आहे. तसेच 2 असे खेळाडू आहेत, ज्यांनी भारत दौऱ्यात टेस्ट डेब्यू केलं होतं. या दोघांमध्ये टॉड मर्फी आणि मॅट कुह्रेमन यांचा समावेश आहे.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहिला सामना, 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी, गाले
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुसरा सामना, 6 ते 10 फेब्रुवारी, गाले
श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा 16 सदस्यीय संघ जाहीर, जाणून घ्या
Introducing our 16-player squad for our Qantas Men’s Tour of Sri Lanka 🇱🇰#SLvAUS pic.twitter.com/BUWJHr5Zz4
— Cricket Australia (@CricketAus) January 9, 2025
श्रीलंका दौऱ्यातील 2 कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम : स्टीव्हन स्मिथ (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड (उपकर्णधार), शॉन एबट, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, सॅम कॉन्स्टस, मॅट कुह्नेमन, मार्नस लबुशेन, जॉश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, टॉड मर्फी, नॅथन लायन, नॅथन मॅक्स्विनी, मिचेल स्टार्क, ब्यू वेब्स्टर आणि कूपर कोनोली.