SL vs BAN : अँजेलो मॅथ्यूजने ‘त्या’ प्रकरणाबद्दल तोंड उघडलं, Video चा दाखला देत बांगलादेशवर टीका

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अँजेलो मॅथ्यूज टाइम आऊट पद्धतीने बाद झाला. यामुळे क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली होती. याबाबत श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिस याने नाराजी व्यक्त केली. तर शाकिबने घेतलेला निर्णय योग्य असल्याचं सांगितलं. आता यावर मॅथ्यूजने आपलं म्हणणं मांडलं आहे.

SL vs BAN : अँजेलो मॅथ्यूजने 'त्या' प्रकरणाबद्दल तोंड उघडलं, Video चा दाखला देत बांगलादेशवर टीका
SL vs BAN : तशा पद्धतीने आऊट झाल्यानंतर अँजेलो मॅथ्यूजची पहिलीच प्रतिक्रिया, बांगलादेशवर टीका करत सांगितलं की..
Follow us
| Updated on: Nov 07, 2023 | 2:47 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतून श्रीलंका आणि बांगलादेश या संघांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पण या दोन्ही संघातील सामना टाईम आऊट निर्णयामुळे चांगलाच गाजला. अँजेलो मॅथ्यूज मैदानात आला आणि हेल्मेटची स्ट्रिप तुटल्याने ते बदलण्यासाठी गेला. नेमकं त्या वेळेस शाकिब अल हसनने टाईम आऊटची अपील केली आणि पंचांना नियमानुसार बाद घोषित करावं लागलं. यानंतर क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. काही जण या नितीचं समर्थन करत आहेत. तर काही जण स्पोर्ट्सशिपचे दाखले देत शाकिब अल हसनवर टीका करत आहेत. या सर्व प्रकरणावर आता खुद्द अँजेलो मॅथ्यूज याने म्हणणं मांडलं आहे. आपलं म्हणणं मांडत असताना त्याने कर्णधार शाकिब अल हसन आणि बांगलादेश संघावर टीकास्त्र सोडलं आहे.

काय म्हणाला अँजेलो मॅथ्यूज?

‘झालेला संपूर्ण प्रकार दुर्दैवी आहे, त्यांनी त्यांची अक्कल कुठे गहाण ठेवली माहिती नाही. झालेल्या प्रकाराचं खूपच वाईट वाटतं. शाकिब आणि बांगलादेश संघ अशा पद्धतीने क्रिकेट खेळत असेल तर खूपच वाईट आहे. पण यात काहीतरी चुकीचं घडलं हे मात्र निश्चितपणे सांगू शकतो. जर मी लेट गेलो, मी माझे दोन मिनिटं वाया घालवली. पण नियम असा सांगतो की दोन मिनिटात तयार व्हावं. मी तिथे दोन मिनिटं पूर्ण होण्यापूर्वी पोहोचलो होतो. माझ्याकडे 5 सेकंद होते. पण पंचांनी सांगितली की हेल्मेट तुटलेलं दिसलं नाही. मी फक्त हेल्मेटच मागत होतो.’, असं अँजेलो मॅथ्यूज याने सांगितलं.

“मला आजपर्यंत बांगलादेश संघाबाबत खूपच आदर होता. साहाजिकच सर्वजण जिंकण्यासाठी खेळतात. जर नियमात असेल तर ठीक आहे. पण मी तिथे दोन मिनिटांच्या आत होतो. आमच्याकडे व्हिडीओ पुरावा आहे. मी काही असंच बोलत नाही. याबाबतचे सर्व पुरावे आहेत.”, असं अँजेलो मॅथ्यूज म्हणाला.

“दुसरा कोणता संघ असता तर असं केलं नसतं. पण हेल्मेटचं बक्कल तुटल्याने सुरक्षेचाही प्रश्न होता. हेल्मेटशिवाय मी गोलंदाजांचा सामना करू शकत नव्हतो. यात कोणाचा अपमान करण्यासारखं काहीच नव्हतं.”, अंसही अँजेलो मॅथ्यूज पुढे म्हणाला.

‘शाकिबकडे अपील मागे घेण्याचा पर्याय होता. कारण मी तिथे वेळेत पोहोचलो होतो. पण त्याने दुसरा मार्ग निवडला, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्या जागी दुसरा संघ असता तर असं केलं नसतं. माझ्या 15 वर्षांच्या करिअरमध्येमी कधीच असं पाहिलं नाही.’, अशी टीकाही अँजेलो मॅथ्यूज याने केली.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.