SL vs BAN, Video : अँजेलो मॅथ्यूजला तसं करणं चांगलंच भोवणार! सीमेरेषेवर पाय टाकताचं केलं असं काही…
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यू नियमांच्या कचाट्यात अडकला आणि बाद झाला. शाकिब अल हसन याने पंचांकडे अपील केलं आणि त्याला तंबूचा रस्ता दाखवला. आता मॅथ्यूजने राग व्यक्त करताना मोठी चूक केली त्याचा त्याला फटका बसू शकतो.
मुंबई : वनडे वर्ल्डकप इतिहासात नोंद केली जाईल अशी घटना श्रीलंका बांगलादेश सामन्यात घडली आहे. अँजेलो मॅथ्यूज एकही चेंडू न खेळता बाद झाला आहे. टाईम आऊटचा फटका त्याला बसला आणि शाकिब अल हसनच्या अपीलवर त्याला तंबूचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधये टाइम आउट पद्धतीने आऊट होणारा पहिलाच फलंदाज आहे. यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे अँजेलो मॅथ्यूजला आधी कळलंच नाही नेमकं काय झालं? पंचांनी बाद दिल्यानंतर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. असं कसं झालं म्हणून त्याने पंचांशी वादही घातला. पण आयसीसी नियमांच्या कचाट्यात सापडल्याने काहीच करू शकला नाही. त्यामुळे त्याला एकही चेंडू न खेळता तंबूत परतावं लागलं. तंबूत जाताना त्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता.
नेमकं काय झालं?
बांगलादेशकडून 25 वं षटक घेऊन शाकीब अल हसन आलं होतं. सदीरा समरविक्रमा दुसऱ्या चेंडुवर बाद झाला. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूज मैदानात आला. पण त्याच्या हेल्मेटची स्ट्रिप तुटली होती. त्यामुळे त्याने दुसरं हेल्मेट मागवलं. त्यात काही वेळ गेला आणि शाकिब अल हसन याने टाइम आउटसाठी अपील केलं. आयसीसीच्या नियमानुसार मैदानात फलंदाज आल्यानंतर दोन मिनिटात चेंडू फेस करावा असा नियम आहे. त्यामुळे मॅथ्यूजला बाद घोषित करण्यात आलं. मात्र त्याने पंचांसोबत यासाठी हुज्जत घातली. तसेच अपील मागे घेण्यासाठी बांगलादेशला विनंती केली. मात्र त्याचं काही ऐकलं नाही. शेवटी मॅथ्यूज तंबूच्या दिशेने रागारागात निघाला. इतकं काय तर सीमेरेषेवर जोराने हेल्मेट फेकलं.
View this post on Instagram
आयसीसी नियमानुसार कोणताही खेळाडू अशा पद्धतीने वागू शकत नाही. म्हणजेच क्रिकेटच्या सामनाची तोडफोड करू शकत नाही. असं केल्यास शिक्षेची तरतूद आहे. त्याला दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे आता आयसीसी काय पाऊल उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणातून आता इतर खेळाडूंनी धडा घ्यायला हवा असं म्हणावं लागेल.
श्रीलंकेच्या वर्ल्डकप स्क्वॉडमध्ये मथीशा पथिराना दुखापतग्रस्त झाल्याने अँजेलो मॅथ्यूजला संधी मिळाली. अष्टपैलू खेळाडू असल्याने त्याचा फायदा संघाला होईल असं त्यामागचं गणित होतं. बांगलादेश आणि श्रीलंकेचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. बांगलादेश विरुद्धचा सामना चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. आठव्या स्थानावर राहिल तोच संघ पात्र असणार आहे.