SL vs BAN Live Streaming | श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आमनेसामने, सामना फुकटात कुठे पाहता येणार?
Sri Lanka vs Bangaldesh Asia Cup 2023 Live Streaming | बांगलादेश क्रिकेट टीमचा सुपर 4 मधील दुसरा आणि श्रीलंका विरुद्धचा पहिला सामना आहे. हा सामना कुठे पाहता येणार?
कोलंबो | आशिया कप 2023 सुपर 4 मधील दुसरा सामना हा 9 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या सामन्यात श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आमनेसामने असणार आहेत. श्रीलंकेचा सुपर 4 मधील पहिलाच सामना आहे. तर बांगलादेशचा दुसरा सामना आहे. बांगलादेशला सुपर 4 मधील आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत व्हावं लागलं होतं. पाकिस्तानने बांगलादेशचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला होता. त्यामुळे बांगलादेशसाठी सुपर 4 मधील आव्हान कायम राखण्यासाठी श्रीलंका विरुद्धच्या सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. या सामन्याबाबत आपण जाणून घेऊयात.
आकडेवारी कुणाच्या बाजूने?
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका आतापर्यंत एकूण 52 एकदिवसीय सामन्यात भिडले आहेत. यामध्ये श्रीलंकेची बाजू वरचढ आहेत. श्रीलंकेने 52 सामन्यांपैकी 41 सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. तर बांगलादेशने 9 सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला आहे. त्यामुळे आकडेवारीच्या हिशोबाने श्रीलंकाच बांगलादेशवर वरचढ आहे. मात्र क्रिकेटमध्ये काहीही निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे आता हा सामना कोण जिंकणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सुपर 4 सामना कधी?
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सुपर 4 मधील सामना हा शनिवारी 9 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना कोणत्या स्टेडियममध्ये?
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सुपर 4 मधील सामना हा कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडणार आहे.
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामना हा टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना मोबाईलवर हॉटस्टार एपद्वारे फुकटात पाहता येणार आहे.
आशिया कपसाठी श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, महेश थिक्षाना, दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, कसून राजिथा, दुशन हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मधुशन.
आशिया कप 2023 साठी बांगलादेश टीम | शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास, तंजीद हसन तमीम, नजमुल हुसैन शांतो, तॉहिद हृदॉय, मुशफीकुर रहीम, मेहंदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसेन, अफीफ हुसेन, शरीफुल इस्लाम, एबादत हुसेन आणि मोहम्मद नईम.