SL Vs Eng : इंग्लंडच्या टीमने रचला इतिहास, टेस्ट क्रिकेटच्या 144 वर्षांच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं….!

श्रीलंकविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फिरकीपटूंची कमाल पाहायला मिळाली

SL Vs Eng : इंग्लंडच्या टीमने रचला इतिहास, टेस्ट क्रिकेटच्या 144 वर्षांच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं....!
Ind Vs Eng 2nd test Match
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 9:01 AM

गॅले :  श्रीलंकविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फिरकीपटूंची कमाल पाहायला मिळाली (SL Vs Eng). फिरकीपटू जॅक लिच (jack Leach) आणि डॉम बेस (Domm bess) यांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेऊन श्रीलंकेच्या दुसऱ्या डावाला भगदाड पाडलं. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुटने (joe Root) दोन बॉलमध्ये दोन फलंदाजांना आऊट करुन श्रीलंकेचा डाव 126 धावांवर संपवला. अशा रितीने श्रीलंकेच्या सगळ्या 10 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या. तर पहिल्या डावात इंल्लंडच्या जलदगती गोलंदाजांनी श्रीलंकेच्या 10 विकेट्स मिळल्या होत्या. टेस्ट क्रिकेटच्या 144 वर्षांच्या इतिहासात असा रेकॉर्ड करणं अजून कुणाला जमलं नव्हतं तो रेकॉर्ड इंग्लडने आपल्या नावावर केला आहे. (SL Vs Eng 2nd test match pacers And Spiners Historical Performance)

क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम झालेला नव्हता…

कसोटी क्रिकेटच्या 144 वर्षांच्या इतिहासात कुणालाही जमली नाही अशी क्रांती इंग्लंडने करुन दाखवली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या डावांत इंग्लंडच्या जलदगती गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत श्रीलंकेच्या खेळाडूंना जेरीस आणलं. इंग्लंडच्या जलदगती गोलंदाजांचा अचूक टप्प्यावरचा मारा इतका प्रभावी राहिला की त्यांनी श्रीलंकेच्या सगळ्याच्या सगळ्या 10 विकेट्स मिळवल्या. तर दुसऱ्या डावांत इंग्लंडच्या फिरकीपटूंचा जलवा पाहायला मिळाला. फिरकीपटू जॅक लिच आणि डॉम बेस यांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. तर इंग्लंडचा कर्णधार जो रुटने दोन बॉलमध्ये दोन फलंदाजांना आऊट करुन श्रीलंकेचा डाव 126 धावांवर संपवला.

कसोटी क्रिकेटची 1876 साली सुरुवात झाली. यानंतर आतापर्यंत असा रेकॉर्ड कधीच झाला नव्हता किंबहुना पाहायला मिळाला नव्हता. मात्र 144 वर्षानंतर इंग्लंडने ही क्रांती करुन दाखवली आहे. पहिल्या डावात जलदगती गोलंदाजांनी धमाल उडवून दिल्यानंतर दुसऱ्या डावांत फिरकीपटूंनी जलवा दाखवला. श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात पहिल्या 4 ओव्हर संपताच इंग्लडच्या कर्णधाराने फिरकीपटूंना पाचारण केलं. आपल्या कर्णधाराने दाखवलेला विश्वास इंग्लंडच्या फिरकीपटूंनी साध्य करुन दाखवला आणि श्रीलंकेच्या सगळ्याच्या सगळ्या 10 विकेट्स मिळवल्या.

जेम्स अँडरसनच्या पहिल्या डावात 6 विकेट्स

श्रीलंकेचा पहिला डाव 381 धावांत आटोपला. ज्यामध्ये अँडरसनने आश्चर्यकारक कामगिरी करत 6 गडी बाद केले तर 3 विकेट मार्क वुडने घेतल्या. याशिवाय सॅम क्रेनने एक विकेट घेतली. यानंतर जेव्हा इंग्लंडचा संघ फलंदाजीला आला तेव्हा श्रीलंकेच्या लेसिथ अंबुलडेनियाने 137 धावांत 7 गडी बाद केले. (SL Vs Eng 2nd test match pacers And Spiners Historical Performance)

हे ही वाचा

England Tour India 2021 | इंग्लंडच्या या खेळाडूचा भारताला धोका, चष्मा घालून दांडी गुल करण्यात माहिर!

#INDvsENG | टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा

England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.