SL vs IND: 7 चौकार-3 षटकार, हिटमॅनचं श्रीलंकेविरुद्ध विक्रमी अर्धशतक

Rohit Sharma Fifty: रोहित शर्मा याने श्रीलंके विरुद्ध तोडफोड खेळी केली. रोहितने मैदानात चौफेर फटकेबाजी करत अर्धशतकासह अनेक विक्रम केले आहेत.

SL vs IND: 7 चौकार-3 षटकार, हिटमॅनचं श्रीलंकेविरुद्ध विक्रमी अर्धशतक
rohit sharma sl vs ind 1st odi
Follow us
| Updated on: Aug 02, 2024 | 8:36 PM

रोहित शर्मा याने टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर 1 महिन्याने शानदार कमबॅक केलं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना चौफेर फटकेबाजी करत शानदार खेळी केली आहे. रोहितने श्रीलंकेच्या गोलंदाजांविरुद्ध फटकेबाजी करत शानदार अर्धशतक ठोकलं आहे. रोहितने श्रीलंके विरुद्ध 231 धावांचा पाठलाग करताना शुबमन गिलसह अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाला कडक सुरुवात करुन दिली. तसेच अर्धशतक झळकावत अनेक विक्रमही आपल्या नावे केले.

शुबमन गिल-रोहित शर्मा या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 12.4 ओव्हरमध्ये 75 धावांची भागीदारी केली. रोहितने या भागीदारी दरम्यान सिक्स ठोकून अर्धशतक पूर्ण केलं. रोहितने 10 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर अकिला धनंजयाच्या बॉलिंगवर सिक्स ठोकून अर्धशतक झळकावलं. रोहितच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 56 वं अर्धशतक ठरलं. रोहितने 33 बॉलमध्ये 7 चौकार आणि 3 षटकारांसह160.61 च्या स्ट्राईक रेटने 56 वं अर्धशतक पूर्ण केलं. रोहितला अर्धशतकाचं रुपांतर मोठ्या खेळीत करण्याची चांगली संधी होती. मात्र रोहित फार वेळ मैदानात टीकू शकला नाही. रोहित 47 बॉलमध्ये 58 धावा करुन आऊट झाला. युवा दुनिल वेल्लालगे याने रोहितला एलबीडबल्यू आऊट केलं.

रोहितने या 58 धावांच्या खेळींसह 2 विक्रम आपल्या नावे केले आहेत. रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान 15 हजार धावा करणारा दुसरा सलामीवीर ठरला आहे. तसेच रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स ठोकणारा पहिला कर्णधार ठरला आहे.

रोहितचं षटकारासह अर्धशतक पूर्ण, पाहा व्हीडिओ

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन: चारिथ असालंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटीकपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालगे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो आणि मोहम्मद शिराज.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.

अमित शाहांनी आपल्या पत्नीसह घेतले लालबागच्या राज्याचे आशीर्वाद
अमित शाहांनी आपल्या पत्नीसह घेतले लालबागच्या राज्याचे आशीर्वाद.
शरद पवार लालबागच्या राजाच्या दरबारी, नात अन् जावयासोबत बाप्पाच्या चरणी
शरद पवार लालबागच्या राजाच्या दरबारी, नात अन् जावयासोबत बाप्पाच्या चरणी.
बाप्पाच्या मूर्तीवरून संभाजी ब्रिगेडचा आक्षेप,आक्रमक होण्याच कारण काय?
बाप्पाच्या मूर्तीवरून संभाजी ब्रिगेडचा आक्षेप,आक्रमक होण्याच कारण काय?.
आपल्याच मुलीला नदीत फेकणार? आत्रामांचं टीकास्त्र अन् पवार गटाचा पलटवार
आपल्याच मुलीला नदीत फेकणार? आत्रामांचं टीकास्त्र अन् पवार गटाचा पलटवार.
दादांच्या मनात खेद की दबावतंत्र? बारामतीतच धाकधूक नेमकी कशाची?
दादांच्या मनात खेद की दबावतंत्र? बारामतीतच धाकधूक नेमकी कशाची?.
लोकसभेत पंकजा ताईंना फटका, विधानसभेत धनूभाऊंची खबरदारी?
लोकसभेत पंकजा ताईंना फटका, विधानसभेत धनूभाऊंची खबरदारी?.
'ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही, त्यांनी बोलू नये',राऊतांवर कुणाची टीका?
'ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही, त्यांनी बोलू नये',राऊतांवर कुणाची टीका?.
बाप्पाच्या हातून मोदक पडला अन्..., मोदकेश्वराची अख्यायिका माहितीये का?
बाप्पाच्या हातून मोदक पडला अन्..., मोदकेश्वराची अख्यायिका माहितीये का?.
दादा भरसभेत काय म्हणाले, बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला....
दादा भरसभेत काय म्हणाले, बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला.....
राणा दाम्पत्य लालबागच्या राजा चरणी लीन,काय मागितल नवनीत राणांनी साकडं?
राणा दाम्पत्य लालबागच्या राजा चरणी लीन,काय मागितल नवनीत राणांनी साकडं?.