SL vs IND 1st Odi: भारत-श्रीलंका पहिला सामना टाय होऊनही सुपर ओव्हर का नाही? कारण..
Sri vs IND 1st ODI Match Tied: टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला सामना टाय झाला. मात्र या सामन्याचा निकाल सुपर ओव्हर करुन का लावण्यात आला नाही? जाणून घ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंग करत टीम इंडियासमोर 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 230 धावा केल्या. प्रत्युत्तरात कॅप्टन रोहित शर्माने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाची चांगली सुरुवात झाली. मात्र रोहित आऊ झाल्यानंतर टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स टाकल्या. त्यामुळे टीम इंडिया 48 व्या ओव्हरमध्येच 230 ऑलआऊट झाली. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. सामना बरोबरीत सुटल्यावर विजेता संघ सुपर ओव्हरने ठरवला जातो. मात्र पहिला एकदिवसीय सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर का झाली नाही? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. त्याचं कारण आपण जाणून घेऊयात.
..म्हणून सुपर ओव्हर झाली नाही
वनडे सीरिजआधी उभयसंघात 3 सामन्यांची टी20i मालिका झाली. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा टाय झाला. त्यामुळे सामन्याचा निकाला सुपर ओव्हरने लागला. भारताने विजय मिळवला. मग आता दोन्ही संघ पण तेच आहेत, मग सुपर ओव्हर का नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सुपर ओव्हर न होण्यामागे नियम आहे. नियमानुसार, एकदिवसीय द्विपक्षीय मालिकेत सुपर ओव्हर होत नाही. अर्थात 2 संघांमध्ये होणाऱ्या वनडे सीरिजमधील सामना टाय झाल्यास तो तिथेच संपतो. त्या सामन्याला निकाल काढला जात नाही. त्यामुळे इंडिया-श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर झाली नाही.
सलामीचा सामना बरोबरीत
Things went down to the wire in Colombo as the match ends in a tie!
On to the next one.
Scorecard ▶️ https://t.co/4fYsNEzggf#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/yzhxoyaaet
— BCCI (@BCCI) August 2, 2024
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन: चारिथ असालंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटीकपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालगे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो आणि मोहम्मद शिराज.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.