SL vs IND 1st Odi Live Streaming: टी 20iनंतर आता वनडे सीरिज, पहिला सामना किती वाजता?
Sri Lanka vs India 1st Odi Live Streaming: भारतीय क्रिकेट संघ यजमान श्रीलंके विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा या मालिकेत भारताचं नेतृत्व करणार आहे.
टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात टी20i नंतर आता एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टी20i प्रमाणे एकदिवसीय मालिकेतही 3 सामने असणार आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव, श्रेयस, अय्यर आणि केएल राहुल या खेळाडूंचं या मालिकेतून कमबॅक झालं आहे. त्यामुळे या खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. तसेच टी 20 मालिकेतील पराभवांनतर वनडे सीरिजमध्ये शानदार सुरुवात करण्याचं आव्हान हे यजमान श्रीलंकेसमोर असणार आहे. चरित असालंका हा श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर रोहित शर्मा भारताचं कर्णधारपद सांभाळणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा कुठे पाहता येणार? जाणून घेऊयात.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया पहिला एकदिवसीय सामना केव्हा?
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया पहिला एकदिवसीय सामना कुठे?
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया पहिला एकदिवसीय सामना आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया पहिला एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया पहिला एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 2 वाजता टॉस होईल.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया पहिला एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया पहिला एकदिवसीय सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स (फ्री डीश) आणि सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया पहिला एकदिवसीय सामना मोबाईवर कुठे पाहता येणार?
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया पहिला एकदिवसीय सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, खलील अहमद, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग आणि हर्षित राणा.
श्रीलंका टीम : चरिथ असालंका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराझ, चमिका करुणा, चमिका करुणा, मोहम्मद शिराज मेंडिस, निशान मधुष्का आणि एशान मलिंगा.