SL vs IND 1st T20i: श्रीलंकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, टीम इंडियाची बॅटिंग की बॉलिंग?
Sri Lanka vs India 1st T20I Toss: श्रीलंकेने टी 20i मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकला आहे. पाहा दोन्ही संघांची प्लेइंग ईलेव्हन.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिल्या टी 20 मालिकेत दोन्ही संघांचं 2 नवे कर्णधार नेतृत्व करत आहेत. रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादव भारतीय संघाची धुरा सांभाळत आहेत. तर चरिथ असलंका श्रीलंकेची कॅप्टन्सी करतोय. टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यातील टी 20 मालिकेतील सलामीच्या सामन्याचं आयोजन हे पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. श्रीलंकेने टॉस जिंकला. कॅप्टन चरिथ असलंका याने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे आता टीम इंडिया 20 ओव्हरमध्ये किती धावा करणार? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
संजू सॅमसन याला डच्चू
टीम इंडियाच्य प्लेइंग ईलेव्हनमध्ये संजू सॅमसन याला नेहमीप्रमाणे वगळण्यात आलं आहे. तर दुसऱ्या बाजूला मात्र झिंबाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या रियान परागला संधी देण्यात आली आहे. तसेच वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे आणि खलील अहमद यांनाही संधी दिलेली नाही. त्यामुळे आता या चौघांना पुढील संधीसाठी दुसऱ्या सामन्याची वाट पाहावी लागणार आहे.
सूर्या-गंभीर पर्वाला सुरुवात
दरम्यान या सामन्याने टीम इंडियात सूर्या-गंभीर पर्वाला सुरुवात झाली आहे. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. तर रोहित शर्मा याने टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर या प्रकारातून निवृत्ती घेतल्यानंतर सूर्यकुमार यादव याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता कॅप्टन म्हणून सूर्यकुमार यादव कशी कामगिरी करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
श्रीलंकेने टॉस जिंकला
Charith Asalanka won the toss and elected to the field first! #SLvIND pic.twitter.com/FZo0cCU8G6
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 27, 2024
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन: चरित असलंका(कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस(विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, दासुन शनाका, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो आणि दिलशान मदुशंका.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रियान पराग, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.