SL vs IND Rain: टीम इंडियाला रोखत वरुणराजाची ‘बॅटिंग’ सुरु, पावसामुळे खेळ थांबला
Sri Lanka vs India 2nd T20I Rain: श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसऱ्या टी 20i सामन्यात पावसाने खोडा घातला. सामन्यातील दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या बॅटिंग दरम्यान पावसाने एन्ट्री घेतल्याने सामना थांबवण्यात आला आहे. श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 162 धावांचा पाठलाग करायला आलेल्या टीम इंडियाने पहिले 3 बॉल खेळल्यानंतर पावसाने बॅटिंग सुरु केली. त्यामुळे खेळ थांबवावा लागला. पाऊस सुरु झाल्याने टीम इंडियाची सलामी जोडी आणि श्रीलंकेचे खेळाडू मैदानाबाहेर निघाले. तर ग्राउंड्समॅन वेगाने मैदानात येऊन त्यांनी खेळपट्टी झाकली. आता क्रिकेट चाहत्यांना सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? याची प्रतिक्षा लागून आहे.
टीम इंडियाची यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन ही सलामी जोडी मैदानात आली. एकट्या यशस्वीनेच 3 बॉलमध्ये 6 धावा केल्या. त्यानंतर 9 वाजून 35 मिनिटांच्या आसपास पावसाने एन्ट्री केली. त्यामुळे यशस्वी-संजू ही जोडी मैदानाबाहेर गेली. काही मिनिटं पाऊस पडला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर आता ग्राउंड स्टाफ खेळपट्टी कोरडी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. खेळ थांबून आता एक तासापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यामुळे आता नियमानुसार ओव्हर कमी केल्या जाणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
श्रीलंकेची बॅटिंग
दरम्यान त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून श्रीलंकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. श्रीलंकेच्या एकूण 6 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. त्यामुळे श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 161 धावा करता आल्या.
पावसामुळे खेळ थांबला
Rain has stopped play
Stay tuned for updates
Follow the Match ▶️ https://t.co/R4Ug6MQGYW#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/fa0gbuGdDA
— BCCI (@BCCI) July 28, 2024
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरित असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस(विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश तीक्षना, मथीशा पाथिराना आणि असिथा फर्नांडो.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि मोहम्मद सिराज.