श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 3 टी20i सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना हा आज 28 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आलं आहे. सामन्याला नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र पावसामुळे टॉसला विलंब झाला आहे. काही मिनिटांनंतर पाऊस थांबला आहे. त्यानंतर आता बीसीसीआयने सोशल मीडियावरुन सामन्याबाबत मोठी अपडेट दिली आहे.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसऱ्या सामन्यातील टॉस संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी होणार आहे. तर 7 वाजून 45 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होणार असल्याची माहिती बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट चाहत्यांना टॉसची प्रतिक्षा आहे.
दरम्यान टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने पहिला सामना हा 40 धावांनी जिंकला होता. त्यामुळे टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेचा हा सामना जिंकून मालिकेत 1-1 बरोबरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.
दुसऱ्या टी20 सामन्याला पावणे आठला होणार सुरुवात
Update:
Rain has stopped
Toss at 7.15 PM IST
Start of Play: 07.45 PM IST#TeamIndia | #SLvIND https://t.co/vA3xO4mJBS
— BCCI (@BCCI) July 28, 2024
टी 20 सीरिजसाठी श्रीलंका टीम: चरिथ असलांका (कॅप्टन), पथुम निसांका, कुसल परेरा ,अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालागे ,महेश तीक्षाना,चामिंडु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, बिनुरा फर्नांडो, दिलशान मधुशंका आणि असिथा फर्नांडो
टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.