SL vs IND: कॅप्टन सूर्याकडून आपल्या नेतृत्वातील पहिल्याच टी 20I मालिका विजयाचं श्रेय कुणाला?
Sri Lanka vs India Suryakumar Yadav: टीम इंडियाने झिंबाब्वेनंतर श्रीलंका विरुद्धची मालिका जिंकली आहे. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने या विजयाचं श्रेय कुणाला दिलं? जाणून घ्या.
टीम इंडियाने श्रीलंकेवर दुसऱ्या टी 20I सामन्यात डीएलएसनुसार 7 विकेट्सने विजय मिळवला. भारतीय क्रिकेट संघाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली. तसेच सूर्यकुमार यादव याने पूर्णवेळ कर्णधार होताच आपल्या पहिल्याच मालिकेत भारताला विजयी केली. टीम इंडियाच्या या विजयामुळे सूर्यकुमार यादव फार आनंदी आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर सूर्याने युवा खेळाडूंचं भरभरुन कौतुक केलं. सूर्याने सामन्यानंतर काय काय म्हटलं? हे आपण जाणून घेऊयात. “पावसाने आमची मदत केली. मुलं ज्या पद्धतीने दोन्ही सामन्यात खेळली आहेत, ते पाहून खरंच चांगलंच वाटतंय. कठीण परिस्थिीतीत त्यांनी चांगली कामगिरी केली”, असं सूर्याने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनदरम्यान म्हंटलं.
सामन्याचा धावता आढावा
दरम्यान टीम इंडियाने श्रीलंकेला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं. श्रीलंकेने 20 ओव्हरमध्ये 161 धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयसाठी 162 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाच्या सलामी जोडीने 3 बॉलमध्ये 6 धावा केल्या. मात्र त्यानंतर आलेल्या पावसामुळे तासाभरापेक्षा अधिक वेळ वाया गेला. त्यामुळे टीम इंडियाला डीएलएसनुसार सुधारित आव्हान मिळालं. भारताने डीएलनुसार 8 ओव्हरमध्ये मिळालेलं 78 धावांचं आव्हान हे 9 बॉल राखून पूर्ण केलं.
संजू सॅमसन याचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या फलंदाजांनी स्फोटक बॅटिंग केली. यशस्वी जयस्वाल याने 15 बॉलमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटने 30 धावा केल्या. यशस्वीने 3 चौकार आणि 2 षटकार खेचले. कर्णधार सूर्यकुमार यादव याने 12 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 26 रन्स केल्या. तर हार्दिक पंड्या याने 9 बॉलमध्ये 3 फोर आणि 1 सिक्ससह नॉट आऊट 22 रन्स केल्या. तर ऋषभ पंतने नाबाद 2 धावा केल्या.
सूर्याच्या नेतृत्वात भारताचा मालिका विजय
INDIA WON THE T20I SERIES AGAINST SRI LANKA…..!!!! 🇮🇳
– What a start for Surya 🤝 Gambhir Era. pic.twitter.com/8Cs28paFNA
— Johns. (@CricCrazyJohns) July 28, 2024
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरित असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस(विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश तीक्षना, मथीशा पाथिराना आणि असिथा फर्नांडो.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि मोहम्मद सिराज.