टीम इंडियाने श्रीलंकेवर दुसऱ्या टी 20 सामन्यात डीएलनुसार 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी 162 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर टीम इंडियाने 3 बॉलमध्ये बिनबाद 6 धावा केल्या. मात्र त्यानंतर पावसामुळे तासाभराचा खेळ वाया गेला. त्यामुळे टीम इंडियाला 8 ओव्हरमध्ये 78 धावांचं आव्हान मिळालं. भारतीय संघाने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. टीम इंडियाने 6.3 ओव्हरमध्ये 81 धावा केल्या. टीम इंडियाने या विजयासह मालिका जिंकली. टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाकडून 78 धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल, कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या या तिघांनी फटकेबाजी केली. यशस्वीने टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत श्रीलंकेवर दबाव तयार केला. याचा फायदा सूर्याने घेत चौफेट फटके मारले. तर त्यानंतर हार्दिकने मोठे फटके मारुन टीम इंडियाला विजयी केलं. यशस्वीने 15 बॉलमध्ये 3 चौकार आणि षटकारांच्या मदतीने 200 च्या स्ट्राईक रेटने 30 धावांचं योगदान दिलं.
कॅप्टन सूर्याने 12 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह 26 धावांची खेळी केली. त्यानंतर हार्दिक पंड्या याने फिनिशिंग टच दिला. हार्दिकने अवघ्या 9 बॉलमध्ये 3 फोर आणि 1 सिक्ससह नॉट आऊट 22 रन्स केल्या. ऋषभ पंत 2 धावांवर नाबाद राहिला. तर शुबमन गिल याच्या जागी संधी मिळालेल्या संजू सॅमसन याला भोपळा फोडता आला नाही. श्रीलंकेकडून महीश तीक्षणा, वानिंदू हसरंगा आणि मथीशा पथीराणा या तिघांनी 1-1 विकेट घेतली. दरम्यान मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा आता मंगळवारी 30 जुलै रोजी होणार आहे.
सूर्याच्या नेतृत्वात भारताचा मालिका विजय
#TeamIndia complete a 7 wicket win over Sri Lanka in the 2nd T20I (DLS method) 🙌
They lead the 3 match series 2-0 👍
Scorecard ▶️ https://t.co/R4Ug6MQGYW#SLvIND pic.twitter.com/BfoEjBog4R
— BCCI (@BCCI) July 28, 2024
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरित असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस(विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश तीक्षना, मथीशा पाथिराना आणि असिथा फर्नांडो.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि मोहम्मद सिराज.