SL vs IND: कॅप्टन रोहित मालिका पराभवानंतर संतापला, म्हणाला टीम आणि खेळाडूंमध्ये….
Sri Lanka vs India 3rd Odi Post Match Presentation: टीम इंडियाला श्रीलंके विरुद्ध एकदिवसीय द्विपक्षीय मालिकेत 27 वर्षांनंतर पराभूत व्हावं लागलं. कॅप्टन रोहित या पराभवानंतर चांगलाच संतापला.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील एकदिवसीय मालिका पार पडली आहे. श्रीलंकेने टीम इंडियाव तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात 110 धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेने या विजयासह टीम इंडिया विरुद्ध इतिहास रचला. श्रीलंकेने 1997 नंतर पहिल्यांदा एकदिवसीय द्विपक्षीय मालिकेत टीम इंडिया विरुद्ध विजय मिळवला. श्रीलंकेने पहिला सामना हा बरोबरीत सुटल्यांतर उर्वरित दोन्ही सामने सलग जिंकले. टीम इंडियाच्या फलंदाजांनी श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी टीम इंडियाला 249 धावांचा पाठलाग करताना 26.1 ओव्हरमध्ये 138 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाच्या पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्मा चांगलाच संतापलेला.
कॅप्टन रोहित काय म्हणाला?
रोहितला पराभव आणि फिरकी गोलंदाजाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा रोहित म्हणाला की, “फिरकी आमच्यासाठी चिंतेची बाब नाही. मात आम्हाला याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आमच्या खेळाडूंचा गेम प्लान काय आहे? यावर विचार करावा लागेल. आम्ही या मालिकेत दबावात खेळत होतो”, असं रोहितने म्हटलं.
टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर तु टीमबाबत संतुष्ट झाला आहेस का? असा प्रश्न रोहितला विचारण्यात आला. रोहितने यावर प्रतिक्रिया दिली. “ही काय थट्टा मस्करी नाही. जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा संतुष्ट होऊ शकत नाही. जिथे आम्हाला श्रेय द्याचं आहे, तिथे आम्ही देणार. श्रीलंकेने आमच्यापेक्षा चांगली कामगिरी केली. आम्ही संपूर्ण मालिकेत चांगला खेळ करण्यात अपयशी ठरलो. त्यामुळे आमच्यावर ही स्थिती ओढावली आहे.”
रोहितने आणखी काय म्हटंल?
रोहितने मालिका पराभवानंतर काही सकारात्मक बाबींवरही लक्ष वेधलं. आमच्या फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. तसेच मधल्या फळीतील काही फलंदाजांनी उल्लेखनीय बॅटिंग केली. आम्ही सीरिज गमावली. मात्र आम्ही कुठे चांगलं करु शकतो, इथे लक्ष द्यावं लागेल. या पराभवामुळे जगाचा अंत झालेला नाही. आमचे खेळाडू गेल्या काही वर्षांपासून चांगलं खेळतायत. मात्र एखाद वेळेस मालिका गमावता.
टीम आणि खेळाडूंमध्ये बदल होणार
“असे काही खेळाडू आहेत ज्यांच्या कामगिरीवर चर्चा होईल त्यानंतर बदल केले जातील. आम्ही पुढील वेळेस अशा परिस्थितीत खेळण्यासाठी चांगली तयारी करावी लागेल”, असा थेट इशाराच रोहितने दिला.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरिथ असालंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, कामिंडू मेंडिस, दुनिथ वेललागे, महेश तीक्षाना, जेफ्री वेंडरसे आणि असिथा फर्नांडो.