SL vs IND: श्रीलंकेचा 27 वर्षांनंतर ऐतिहासिक मालिका विजय, टीम इंडियावर तिसऱ्या सामन्यात 110 धावांनी मात, दुनिथचा ‘पंच’

Sri Lanka vs India 3rd Odi Match Result: श्रीलंकेने टीम इंडिया विरुद्ध 27 वर्षांनंतर द्विपक्षीय मालिकेत विजय मिळवला आहे. श्रीलंकेने ही मालिका 2-0 फरकाने जिंकली आहे.

SL vs IND: श्रीलंकेचा 27 वर्षांनंतर ऐतिहासिक मालिका विजय, टीम इंडियावर तिसऱ्या सामन्यात 110 धावांनी मात, दुनिथचा 'पंच'
sri lanka team
Follow us
| Updated on: Aug 07, 2024 | 8:51 PM

श्रीलंकेने टीम इंडियाचा तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात 110 धावांनी धुव्वा उडवला आहे. श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी 249 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र श्रीलंकेच्या फिरकी गोलंदांजासमोर टीम इंडियाचा डाव हा 26.1 ओव्हरमध्ये 138 धावांवर आटोपला आहे. श्रीलंकेचा हा दुसरा विजय ठरला आहे. श्रीलंकेने या विजयासह इतिहास रचला आहे. श्रीलंकेने टीम इंडिया विरुद्ध 27 वर्षांनी एकदिवसीय द्विपक्षीय मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. श्रीलंकेने 2-0 अशा फरकाने ही मालिका जिंकली आहे. श्रीलंकेने टीम इंडिया विरुद्ध 1997 साली अखेरची द्विपक्षीय मालिका जिंकली होती. त्यानंतर आता श्रीलंकेने ही प्रतिक्षा संपवली आहे.

टीम इंडियाची बॅटिंग

श्रीलंकेच्या फिरकीसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. टीम इंडियासाठी कॅप्टन रोहित शर्मा याने सर्वाधिक 35 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर याने 30 धावांचं योगदान दिलं. तर विराट कोहली याने 20 रन्स केल्या. डेब्यूटंट रियान परागने 15 धावांची भर घातली. या चौघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. श्रीलंकेसाठी युवा दुनिथ वेल्लालागे याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. दुनिथने कुलदीप यादवला एलबीडब्ल्यू करत टीम इंडियाला ऑलआऊट केलं आणि आपली पाचवी विकेट घेतली. तसेच जेफ्री वेंडरसे आणि महीश तीक्षणा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर असिथा फर्नांडो याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

पहिल्या डावात काय झालं?

दरम्यान त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. श्रीलंकेने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 248 धावा केल्या. श्रीलंकेसाठी त्यांच्या पहिल्या 3 फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या. तर अखेरीस कामिंदू मेंडीस याने छोटेखानी पण निर्णायक खेळी केली. पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडीस या तिघांनी अनुक्रमे 45, 96 आणि 59 अशा धावा केल्या. तर कामिंदुने 23 धावांची नाबाद खेळी केली. तर इतरांना काही खास करता आलं नाही. टीम इंडियाकडून रियान परागने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव या चौघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

श्रीलंकेचा 27 वर्षांनी टीम इंडिया विरुद्ध द्विपक्षीय मालिका विजय

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरिथ असालंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, कामिंडू मेंडिस, दुनिथ वेललागे, महेश तीक्षाना, जेफ्री वेंडरसे आणि असिथा फर्नांडो.

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.