SL vs IND 3rd ODI: टीम इंडियाकडे महारेकॉर्ड करण्याची संधी, रोहितसेना इतिहास रचणार?
India vs Sri Lanka 3rd Odi: श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना हा 7 ऑगस्ट रोजी आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.
श्रीलंका टीम इंडिया विरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. मात्र त्यानंतरही टीम इंडियाला तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात महारेकॉर्ड करण्याची सुवर्णसंधी आहे. मालिकेतील पहिला सामना हा बरोबरीत सुटला. तर श्रीलंकेने दुसऱ्या टीम इंडियाचा धुव्वा उडवत विजयाचं खातं उघडलं आणि मालिकेत आघाडी घेतली. आता टीम इंडियाकडे शेवटच्या सामन्यात विजय मिळवून इतिहास रचण्याची संधी आहे. आतापर्यंत क्रिकेट विश्वात कोणत्याही एका संघाला असा कारनामा करता आलेला नाही.
श्रीलंका क्रिकेट टीमने 1996 साली वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर ठराविक अंतराने अनेक अनुभवी खेळाडूंनी निवृत्ती घेतल्याने श्रीलंकेला उतरती कळा लागली. श्रीलंकेचं आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील आव्हान हे साखळी फेरीतच संपुष्टात आली. मात्र त्यानंतरही श्रीलंकेने आता टीम इंडिया विरुद्ध जोरदार कमबॅक केलं आहे. श्रीलंका टीम सध्या एकदिवसीय मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.
टीम इंडिया विजयाचं शतक लगावणार!
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा 7 ऑगस्ट रोजी आर प्रेमदासा स्टेडियम येथे खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियासमोर हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचं आव्हान असणार आहे. तसेच टीम इंडिया यासह श्रीलंके विरुद्ध विजयाचं शतकही पूर्ण करेल. टीम इंडियाने आतापर्यंत श्रीलंके विरुद्ध 99 एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच आतापर्यंत कोणत्याही संघाला अद्याप प्रतिस्पर्ध्याविरुद्ध 100 एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवता आलेला नाही.
टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, ऋषभ पंत, खलील अहमद, रियान पराग आण हर्षित राणा.
श्रीलंकेचा संघ: चरिथ असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटीकीपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, दुनिथ वेलालगे, कामिंदू मेंडिस, अकिला दानंजया, जेफ्री वांडरसे, असिथा फर्नांडो, चमिका करुणारत्ने, निशान मदुशंका, महीश तीक्षाना, एशान मलिंगा आणि मोहम्मद शिराज.