टीम इंडियाची रोहित शर्माच्या नेतृत्वात श्रीलंके विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये निराशाजनक कामगिरी राहिली आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने जवळपास सामना जिंकला होता. मात्र श्रीलंकेने सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला पराभूत करत श्रीलंकेने विजयाचं खातं उघडलं. श्रीलंकेने विजयासह 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या दोन्ही सामन्यात कॅप्टन रोहितने अर्धशतकी खेळी केली. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे आता भारतासमोर आता तिसऱ्या सामन्यात करो या मरो अशी स्थिती आहे. हेड कोच गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनात तिसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे. त्यासाठी प्लेइंग इलेव्हनमधून 3 खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
केएल राहुलला पहिल्या 2 सामन्यात ऋषभ पंतला बाहेर बसवून संधी देण्यात आली. मात्र या विकेटकीपर बॅट्समनने निराशाजनक कामगिरी केली. केएलने पहिल्या सामन्यात 31 धावांची खेळी केली. तर दुसऱ्या सामन्यात खातंही उघडता आलं नाही. त्यामुळे केएल गंभीरच्या निशाण्यावर असेल. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी केएलच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळू शकते.
ऑलराउंडर शिवम दुबे याच्याकडून बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही आघांड्यावर चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. शिवमकडे पहिल्या सामन्यात टीम इंडियाला विजयी करण्याची संधी होती. मात्र शिवमने निर्णायक क्षणी विकेट टाकली आणि भारताला सामना जिंकण्यात अपयश आलं. तर दुसऱ्या सामन्यात त्याला खातंही उघडता आलं नाही. तसेच शिवमला बॉलिंगनेही काही खास करता आलं नाही.
टीम इंडियाचा ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर यालाही आपली छाप पाडता आली नाही. वॉशिंग्टने 2 सामन्यात अवघ्या 20 धावा केल्या. तर 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे गंभीर सुंदरला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, ऋषभ पंत, खलील अहमद, रियान पराग आण हर्षित राणा.
श्रीलंकेचा संघ: चरिथ असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटीकीपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, दुनिथ वेलालगे, कामिंदू मेंडिस, अकिला दानंजया, जेफ्री वांडरसे, असिथा फर्नांडो, चमिका करुणारत्ने, निशान मदुशंका, महीश तीक्षाना, एशान मलिंगा आणि मोहम्मद शिराज.