SL vs IND: मोहम्मद सिराज श्रीलंकेच्या फलंदाजावर संतापला, व्हीडिओ व्हायरल
mohammed siraj and kusal mendis controversy: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडीस याच्यावर संतापला. व्हीडिओत पाहा दोघांमध्ये काय झालं?
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज संतापलेला दिसला. श्रीलंका-इंडिया यांच्यातील तिसरा आणि शेवटचा सामना हा कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियम येथे खेळवण्यात येत आहे. श्रीलंका या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक आहे. श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या बॅटिंग दरम्यान टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराज यजमान संघाच्या फलंदाज कुसल मेंडीसवर संतापलेला. या दोघांमध्ये नक्की काय झालं? हे जाणून घेऊयात.
नक्की काय झालं?
टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. श्रीलंकेने 38 ओव्हरपर्यंत 3 विकेट्स गमावून 138 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर कॅप्टन रोहित शर्माने श्रीलंकेच्या डावातील 39 वी ओव्हर मोहम्मद सिराज याला टाकायला दिली. सिराज या ओव्हरमधील तिसरा बॉल टाकला. सिराजने 135 किमी वेगाने टाकलेला बॉल कुसल हुशारीने खेळला. त्यानंतर या दोघांनी एकमेकांना रोखून पाहिलं. त्यानंतर सिराजने कुसल मेंडीस याला डिवचण्याचा प्रयत्न केला. दोघेही एकमेकांना खूप काही बोलले. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी 249 धावांचं आव्हान दिलं आहे. श्रीलंकेने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 248 धावा केल्या. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडो याने सर्वाधिक 96 धावा केल्या. तर कुसल मेंडीस-पाथुम निसांका या दोघांनी अनुक्रमे 59 आणि 45 अशा धावा केल्या. तर टीम इंडियाकडून रियान परागने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
मोहम्मद सिराज-कुसल मेंडीस यांच्यात काय झालं?
The perfect response 🔥
Watch the action from #SLvIND LIVE now on Sony Sports Ten 1, Sony Sports Ten 3, Sony Sports Ten 4 & Sony Sports Ten 5 📺 #SonySportsNetwork #SLvIND #TeamIndia | @mdsirajofficial pic.twitter.com/fNf3OQm64g
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 7, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरिथ असालंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, कामिंडू मेंडिस, दुनिथ वेललागे, महेश तीक्षाना, जेफ्री वेंडरसे आणि असिथा फर्नांडो.