Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs IND 3rd T20I Super Over: टीम इंडियाला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 3 धावांंचं आव्हान

Sri Lanka vs India Super Over: टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा सामना हा बरोबरीत सुटल्याने आता सुपर ओव्हर होणार आहे.

SL vs IND 3rd T20I Super Over: टीम इंडियाला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 3 धावांंचं आव्हान
super over
Follow us
| Updated on: Jul 31, 2024 | 1:15 AM

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा आणि शेवटचा सामना हा टाय झाला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 138 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 3 धावांची गरज होती. तेव्हा श्रीलंकेच्या फलंदाजांनी 2 धावा केल्या. त्यामुळे सामना टाय झाला. त्यामुळे आता सुपर ओव्हरने निकाल लागणार आहे. श्रीलंकेने पहिले बॅटिंग केली. तर टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदर याने बॉलिंग केली. वॉशिंग्टने श्रीलंकेच्या कुसल परेरा आणि निसंका या दोघांना आऊट केलं. सुपर ओव्हरमध्ये 2 विकेट्सची मर्यादा असते. त्यामुळे भारताला अवघ्या 3 धावांचं आव्हान मिळालं आहे.

त्याआधी भारताने श्रीलंकेला विजयासाठी 138 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा श्रीलंकेने शानदार पाठलाग केला. आता श्रीलंकेला विजयासाठी शेवटच्या 12 बॉलमध्ये 9 धावांची गरज होती. मात्र रिंकू सिंह आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव यांनी बॅटिंगने नाही, तर बॉलिंगने मॅच फिरवली.  रिंकूने श्रीलंकेच्या डावातील 19 वी ओव्हर टाकली. रिंकूने या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे श्रीलंकेला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 6 धावा करायच्या होत्या. सूर्याने शेवटची ओव्हर करण्याचा निर्णय घेतला. सूर्यानेही आपल्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या. श्रीलंकेला विजयासाठी शेवटच्या बॉलमध्ये विजयासाठी 3 धावा पाहिजे होत्या. मात्र श्रीलंकेच्या फलंदाजांना फक्त 2 धावा करता आल्या. त्यांना सामना जिंकून देता आला नाही. मात्र सामना बरोबरीत सोडवला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये पोहचला.  आता हा सामना टीम इंडिया जिंकून विजयी हॅटट्रिक पूर्ण करते? की श्रीलंका विजय. मिळवून शेवट गोड करणार? हे काही मिनिटात स्पष्ट होईल.

श्रीलंका-भारत तिसरा टी20i सामना टाय

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरित असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश तीक्षाना, मथीशा पाथिराना आणि असिथा फर्नांडो.

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.