SL vs IND: यजमान श्रीलंकेसाठी तिसरा सामना प्रतिष्ठेचा, लाज राखणार का?
Sri Lanka vs India 3rd T20i: श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी 20i सामना हा मंगळवारी 30 जुलै रोजी होणार आहे.
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20 मालिकेत शानदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिले 2 मॅचेस जिंकले आहेत. टीम इंडियाने यासह मालिका खिशात घातली आहे. तर आता टीम इंडियाचा डोळा ही मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकून यजमानांना क्लीन स्वीप देण्यावर आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेसाठी हा सामना प्रतिष्ठेचा असा असणार आहे. त्यामुळे श्रीलंका या सामन्यात पूर्ण ताकदीने उतरणार आहे.
श्रीलंकेसाठी प्रतिष्ठेचा सामना
भारतीय संघाने श्रीलंके विरुद्धचे दोन्ही सामने हे चांगल्या फरकाने जिंकले. पहिला सामना हा भारताने 43 धावांनी जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात डीएलनुसार 7 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने अशाप्रकारे सीरिज लॉक केली. आता श्रीलंकेला तिसरा सामना हा आपल्या प्रतिष्ठेसाठी जिंकावा लागणार आहे. त्यामुळे श्रीलंका टीम इंडियाला रोखण्यात यश मिळवणार? की टीम इंडिया विजयाची हॅटट्रिक पूर्ण करत मालिका विजयाची घोडदौड अशीच भक्कमपणे सुरु ठेवेणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
दरम्यान या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्याला मंगळवारी 30 जुलैला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. हा सामना मोबाईलवर सोनी लिव्ह या एपवरुन पाहता येईल. तर सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टी 20 सीरिजसाठी श्रीलंका टीम: चरिथ असलांका (कॅप्टन), पथुम निसांका, कुसल परेरा ,अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालागे ,महेश तीक्षाना,चामिंडु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, बिनुरा फर्नांडो, दिलशान मधुशंका आणि असिथा फर्नांडो
टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.