SL vs IND 3rd T20i: शुबमन, रियान-सुंदरने लाज राखली, श्रीलंकेसमोर 138 धावांचं आव्हान

| Updated on: Jul 30, 2024 | 10:46 PM

Sri Lanka vs India 3rd T20i 1st Innings: टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी तिसऱ्या टी 20i सामन्यात 138 धावांचं आव्हान दिलं आहे.

SL vs IND 3rd T20i: शुबमन, रियान-सुंदरने लाज राखली, श्रीलंकेसमोर 138 धावांचं आव्हान
shubman riyan and sundar
Follow us on

सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात श्रीलंके विरुद्ध सलग 2 सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाला तिसऱ्या आणि शेवटच्या टी20i सामन्यात चांगलाच संघर्ष करावा लागला. श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. मात्र उपकर्णधार शुबमन गिल, रियान पराग आणि वॉशिंग्टन सुंदर या त्रिकुटाने केलेल्या खेळीमुळे भारताला 130 पार मजल मारता आली. भारताला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 137 धावा करता आल्या. या त्रिकुटाच्या खेळीमुळे भारताला श्रीलंकेसमोर 138 धावांचं सन्मानजनक आव्हान ठेवता आलं.

टीम इंडियाची बॅटिंग

टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाची निराशाजनकसुरुवात राहिली. यशस्वी जयस्वाल 10, संजू सॅमसन 0, रिंकू सिंग 1, सूर्यकुमार यादव 8 आणि शिवम दुबे 13 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 5 बाद 48 धावा अशी झाली. मात्र त्यानंतर रियान पराग आणि शुबमन गिल या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी करुन भारताला 100 पार पोहचवलं. भारताला 102 धावांवर सहावा झटका लागला. शुबमन गिल 37 बॉलमध्ये 39 धावांवर आऊट झाला. त्यानंतर रियान परागही झटपट बाद झाला. रियानने 18 चेंडूत 26 धावांचं योगदान दिलं.

त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर याने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. सुंदरने 18 बॉलमध्ये 2 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 25 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला 130 पार मजल मारता आली. तर रवी बिश्नोई याने 8 धावांचं महत्तवपूर्ण योगदान दिलं. श्रीलंकेकडून महीश तीक्षणा याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. वानिंदु हसरंगाने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर डेब्यूटंट चामिंदू विक्रमसिंघे, असिथा फर्नांडो आणि आर मेंडीस या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

श्रीलंकेसमोर 138 धावांचं आव्हान

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरित असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश तीक्षाना, मथीशा पाथिराना आणि असिथा फर्नांडो.