SL vs IND: टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यात मोठा बदल, बीसीसीआयचा निर्णय
India Tour Of Sri Lanka 2024: टीम इंडिया काही दिवसांनी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याआधी बीसीसीआयने अचानक मोठा निर्णय घेतला आहे.
टीम इंडियाची युवा ब्रिगेड सध्या झिंबाब्वे दौऱ्यावर आहे. टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात झिंबाब्वे विरुद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळत आहे. टीम इंडिया यानंतर जुलैच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. बीसीसाआयने या श्रीलंका दौऱ्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने या दौऱ्यात काही बदल केला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
बीसीसीआयने टीम इंडियाच्या टी 20 आणि एकदिवसीय मालिकेतील वेळापत्रकात बदल केला आहे. बीसीसीआयने नवं वेळापत्रक जाहीर केलं आहे. मात्र वेळापत्रकात बदल करण्याचं नेमकं कारण काय? हे अद्याप सांगितलेलं नाही. मात्र लंका प्रीमियर लीग 2024 स्पर्धेमुळे श्रीलंका-इंडिया टी 20 आणि वनडे सीरिजच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
बीसीसीआयकडून वेळापत्रकात बदल
UPDATE 🚨
A look at the revised schedule for #TeamIndia‘s upcoming tour of Sri Lanka #SLvIND pic.twitter.com/HLoTTorOV7
— BCCI (@BCCI) July 13, 2024
श्रीलंका दौऱ्याचं सुधारित वेळापत्रक
टी 20 सीरिज
पहिला सामना, 27 जुलै, संध्याकाळी 7 वाजता
दुसरा सामना, 28 जुलै, संध्याकाळी 7 वाजता
तिसरा सामना, 30 जुलै, संध्याकाळी 7 वाजता
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 2 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता
दुसरा सामना, 4 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता
तिसरा सामना, 7 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता
टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध प्रत्येकी 3-3 सामन्यांची टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार , टी 20 मालिकेला 26 ऐवजी 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तर एकदिवसीय मालिकेचा श्रीगणेशा 1 ऐवजी 2 ऑगस्टपासून होणार आहे. सुधारित वेळापत्रकात सामन्यांच्या तारखांव्यतिरिक्त कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सामन्याचं ठिकाण आणि वेळ यात कोणताही बदल नाही.
दोन्ही मालिका 2 ठिकाणी
दरम्यान श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20 आणि एकदिवसीय या दोन्ही मालिकांचं आयोजन हे 2 ठिकाणी करण्यात आलं आहे. त्यानुसार टी 20 मालिकेतील तिन्ही सामने हे पल्लेकेले येथे आयोजित करण्यात आले आहेत. तर एकदिवसीय मालिकेतील 3 सामने हे राजधानी कोलंबो येथ पार पडणार आहेत.