SL vs IND: अनुभवी ऑलराउंडरला टी 20 मालिकेतून डच्चू
Sri Lanka vs India T20i Series: टीम इंडिया श्रीलंका दौऱ्याची सुरुवात ही टी 20 मालिकेने होणार आहे. या मालिकेसाठी अनुभवी ऑलराउंडरला डच्चू देण्यात आला आहे.
टीम इंडिया टी 20i आणि वनडे सीरिजसाठी श्रीलंकेत पोहचली आहे. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी 20 मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. श्रीलंकेच्या निवड समितीने या मालिकेसाठी टीममध्ये अनुभवी ऑलराउंडरला संधी दिलेली नाही. त्यामुळे क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अँजलो मॅथ्यूज या 37 वर्षीय अनुभवी ऑलराउंडरला वगळण्यात आलं आहे. मॅथ्यूजने एलपीएल 2024 अर्थात लंका प्रीमियर लीग स्पर्धेत तडाखेदार बॅटिंग केली होती. मॅथ्यूजने या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर टी 20 मालिकेसाठी आपला दावा मजबूत केला होता. मात्र मॅथ्यूजच्या एलपीएलमधील कामगिरीची निवड समितीने काही दखल घेतली नाही. त्यामुळे आता मॅथ्यूजला वनडे सीरिजसाठी तरी संधी दिली जाणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
टी 20 मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 27 जुलै, संध्याकाळी 7 वाजता
दुसरा सामना, 28 जुलै, संध्याकाळी 7 वाजता
तिसरा सामना, 30 जुलै, संध्याकाळी 7 वाजता
अँजलो मॅथ्यूजला डच्चू
Charith Asalanka named Sri Lanka captain for India series
Two senior players in Angelo Mathews and Dhananjaya de Silva, who were part of the T20WC squad, have been left out. pic.twitter.com/0E1c6eDgHY
— Cricket.com (@weRcricket) July 23, 2024
टी 20 सीरिजसाठी श्रीलंका टीम: चरिथ असलांका (कॅप्टन), पथुम निसांका, कुसल परेरा ,अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालागे ,महेश तीक्षाना,चामिंडु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना,नुवान तुषारा, दुष्मंथा चमीरा आणि बिनुरा फर्नांडो.
टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकप्तान), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.