SL vs IND: कॅप्टन सूर्यकुमार यादव हेड कोच गंभीरबाबत काय म्हणाला? व्हीडिओ व्हायरल
Suryakumar Yadav on Gautam Gambhir: श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20 मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होत आहे. त्याआधी टीम इंडियाचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादवने हेड कोच गौतम गंभीरबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात शनिवार 27 जुलैपासून टी20 मालकेने होणार आहे. ही एकूण 3 सामन्यांची मालिका असणार आहे. सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर ही जोडीही या मालिकेतून आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहेत. सूर्यकुमारची ही कॅप्टन तर गंभीरची हेड कोच म्हणून ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे दोघांचाही या मालिकेतून ठसा उमटवण्याचा प्रयत्न असणार आहे. टीम इंडियाने या मालिकेआधी जोरदार सराव केला. बीसीसीआयने या सरावाचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच सूर्यकुमारने गौतम गंभीरबाबत त्याला काय वाटतं हे ही उघडपणे म्हटलंय. बीसीसीआयने याचाही व्हीडिओ शेअर केलाय.
सूर्या काय म्हणाला?
“गौतम गंभीरसह माझे खास नातं आहे. मी केकेआरसाठी पहिल्यांदाच त्यांच्या नेतृत्वात खेळलो होतो. त्यामुळे त्यांच्यासोबतचं संबंध चांगले आहेत. तसेच मी कसा खेळतो आणि माझी मानसिकता काय आहे, हे त्यांना माहित आहे. तसेच मला हे देखील माहित आहे की ते कोच म्हणून काम करण्याचा कसा प्रयत्न करतात. हे सर्व आमच्या प्रेमाच्या नात्याबाबत आहे. तसेच आमच्यातलं हे नातं पुढे कसं जात हे पाहण्यासाठी मी उत्सूक आहे”, असं सूर्या म्हणाला.
मला कॅप्टन म्हणून विनम्र रहायचं असल्याचं सूर्याला वाटतं, कारण तो क्रिकेटकडे खेळ म्हणून नाहीतर जीवन म्हणून पाहतो. “तु्म्ही उल्लेखनीय कामगिरी केल्यांतर किंवा चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरल्यानंतरही किती विनम्र राहता, ही महत्त्वाची बाब मी क्रिकेटमधून शिकलोय. मैदानात जे काही करता ते तिथेच सोडून द्याचं हे मी शिकलोय. हे तुमचं आयुष्य नाही, तर आयुष्याचा भाग आहे. जीवनात संतुलन असणं गरजेचं आहे. तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात, तर सर्वकाही चांगलंच होतं”, असा आशावादही सूर्याने व्यक्त केला.
कॅप्टन सूर्याला हेड कोच गंभीरसोबतच्या नात्याबाबत काय म्हणाला?
𝗦𝘂𝗿𝘆𝗮𝗸𝘂𝗺𝗮𝗿 𝗬𝗮𝗱𝗮𝘃 𝘁𝗮𝗸𝗲𝘀 𝗴𝘂𝗮𝗿𝗱 𝗮𝘀 #𝗧𝗲𝗮𝗺𝗜𝗻𝗱𝗶𝗮‘𝘀 𝗧𝟮𝟬𝗜 𝗰𝗮𝗽𝘁𝗮𝗶𝗻! 🧢#SLvIND | @surya_14kumar pic.twitter.com/KmWz84jZnP
— BCCI (@BCCI) July 26, 2024
टी 20 सीरिजसाठी श्रीलंका टीम: चरिथ असलांका (कॅप्टन), पथुम निसांका, कुसल परेरा ,अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालागे ,महेश तीक्षाना,चामिंडु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, बिनुरा फर्नांडो, दिलशान मधुशंका आणि असिथा फर्नांडो
टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.