टीम इंडियाने पल्लेकेले येथे रविवारी 28 जुलै रोजी श्रीलंकेवर डीएलनुसार 7 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी मिळवली. श्रीलंकेने विजयासाठी 162 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाला पावसामुळे वेळ गेल्याने 8 ओव्हरमध्ये 78 धावांचं सुधारित लक्ष्य मिळालं. टीम इंडियाने हे आव्हान 6.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताने 9 बॉल राखून 81 रन्स केल्या. भारतासाठी यशस्वी जयस्वाल, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या या तिघांनी स्फोटक खेळी केली.
सूर्याने विजयानंतर आनंद व्यक्त करताना युवा खेळाडूंचं कौतुक केलं. आता टीम इंडियाचं लक्ष्य हे तिसरा सामना जिंकून विजयी हॅटट्रिक पूर्ण करण्याकडे आहे. सूर्याला विजयानंतर तिसऱ्या सामन्यासाठी संघात बदल करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सूर्याने काय सांगितलं? हे जाणून घेऊयात.
सूर्यकुमार यादवला दुसऱ्या सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान तिसऱ्या आणि अखेरच्या टी 20 सामन्यातील बदलाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सूर्या म्हणाला की “आम्ही याबाबत बसून निर्णय घेऊ”.
दरम्यान आता या मालिकेसाठी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये एक तो पण नाईलाजाने बदल करण्यात आला. मानेच्या त्रासामुळे शुबमन गिल याच्या जागी संजू सॅमसन याला संधी देण्यात आली होती. तर काही खेळाडूंना संधी मिळाली नाही. यामध्ये वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद आणि शिवम दुबे या तिघांना संधी मिळाली नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात या त्रिकुटाचा समावेश होणार की नाही? हे काही तासातच स्पष्ट होईल.
टी 20 सीरिजसाठी श्रीलंका टीम: चरिथ असलांका (कॅप्टन), पथुम निसांका, कुसल परेरा ,अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालागे ,महेश तीक्षाना,चामिंडु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, बिनुरा फर्नांडो, दिलशान मधुशंका आणि असिथा फर्नांडो
टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.