SL vs IND: श्रीलंका विरूद्धच्या टी20-वनडे सीरिजसाठी कशी असेल टीम इंडिया?
India Squad For India vs Sri Lanka Tour: टीम इंडिया जुलैअखेरीस श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 6 सामने खेळणार आहे.
झिंबाब्वे दौऱ्यात यश मिळवल्यानतंर टीम इंडिया आता श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात श्रीलंके विरुद्ध टी 20I आणि वनडे सीरिज खेळणार आहे. दोन्ही मालिका या 3 सामन्यांच्या असणार आहेत. तसेच याच मालिकेतून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या कारकीर्दीची सुरुवात होणार आहे. त्यामुळे या मालिकेकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 27 जुलैपासून टी 20 सामन्याने होणार आहे. आता या दोन्ही मालिकेसाठी टीम इंडियात कुणाला संधी मिळणार? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर मुख्य आणि अनुभवी खेळाडूंना झिंबाब्वे विरूद्धच्या टी 20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली. त्यामध्ये कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव आणि इतर खेळाडूंचा समावेश होता. तर शिवम दुबे, संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल या तिघांनी काही दिवसांनी झिंबाब्वेत टीम इंडियासह जोडले गेले.
आता श्रीलंके विरूद्धच्या दौऱ्यासाठी अनुभवी खेळाडूंचं कमबॅक होणार आहे. मात्र विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघे या दौऱ्यातही खेळणार नसल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे या दोघांशिवाय टीम इंडिया कशी असेल? दोघांच्या अनुपस्थितीत टी 20 आणि वनडे सीरिजमध्ये नेतृत्व कोण करणार? असाही प्रश्न आहे.
टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक
UPDATE 🚨
A look at the revised schedule for #TeamIndia‘s upcoming tour of Sri Lanka #SLvIND pic.twitter.com/HLoTTorOV7
— BCCI (@BCCI) July 13, 2024
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया: हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, आवेश खान, मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: केएल राहुल (कॅप्टन/विकेटकीपर), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आवेश खान, मुकश कुमार आणि अर्शदीप सिंह.