IND VS SL: शुबमन गिल याला लॉटरी, श्रीलंके विरुद्ध मोठी जबाबदारी

India vs Sri Lanka : बीसीसीआय निवड समितीने शुबमन गिल याला श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियात अनुभवी खेळाडू असतानाही मोठी जबाबदारी दिली आहे.

IND VS SL: शुबमन गिल याला लॉटरी, श्रीलंके विरुद्ध मोठी जबाबदारी
shubman gill team india
Follow us
| Updated on: Jul 18, 2024 | 11:47 PM

बीसीसीआय निवड समितीने श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. उभयसंघात टी20 आणि वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. टी 20 सीरिजमध्ये रोहित शर्मा निवृत्तीनंतर सुर्यकुमार यादव याला कर्णधार करण्यात आलं आहे. तर वनडे सीरिजसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचं कमबॅक झालं आहे. रोहित एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाची जबाबादारी सांभाळणार आहे. तर युवा शुबमन गिल याला लॉटरी लागली आहे.

शुबमन गिलचं प्रमोशन

बीसीसीआयने शुबमन गिलचं प्रमोशन केलं आहे. हार्दिक पंड्या आणि इतर दिग्गज खेळाडू असतानाही शुबमनला दोन्ही मालिकांसाठी टीम इंडियाचं उपकर्णधार करण्यात आलं आहे. शुबमनच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने झिंबाब्वे मोहिम पार पाडली. टीम इंडियाने ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर शुबमनला उपकर्णधारदाची धुरा देण्यात आली आहे.

शुबमन गिलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

शुबमनने टीम इंडियाचं 25 कसोटी, 44 वनडे आणि 19 टी20I सामन्यांमध्ये प्रतिनिध्तल केलं आहे. गिलने कसोटीत 4 शतकांसह 1 हजार 492 धावा केल्या आहेत. तसेच 44 वनडेमध्ये 6 शतकं आणि 13 अर्धशतकांच्या मदतीने 2 हजार 271 रन्स जोडल्या आहेत. तसेच एक द्विशतकाचा समावेश आहे. तर 1 शतक आणि 3 अर्धशतकांसह 19 टी20I सामन्यात शुबमनच्या नावे 505 धावा आहेत.

टीम इंडिया-श्रीलंका टी 20-वनडे सीरिजचं वेळापत्रक

टी 20 सीरिज

पहिला सामना, 27 जुलै, संध्याकाळी 7 वाजता

दुसरा सामना, 28 जुलै, संध्याकाळी 7 वाजता

तिसरा सामना, 30 जुलै, संध्याकाळी 7 वाजता

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 2 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता

दुसरा सामना, 4 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता

तिसरा सामना, 7 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता

टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकप्तान), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.

Non Stop LIVE Update
...अजितदादा फुटले नसते तर सव्वाशे जागा लढवू...काय म्हणाले वडेट्टीवार
...अजितदादा फुटले नसते तर सव्वाशे जागा लढवू...काय म्हणाले वडेट्टीवार.
...याचाच अर्थ तुम्ही शुद्ध भावनेने ...तुमच्या मनात..काय म्हणाले राऊत
...याचाच अर्थ तुम्ही शुद्ध भावनेने ...तुमच्या मनात..काय म्हणाले राऊत.
'राष्ट्रपती राजवट आणा नाही तर...आम्ही...,' काय म्हणाले कॉंग्रेसचे नेते
'राष्ट्रपती राजवट आणा नाही तर...आम्ही...,' काय म्हणाले कॉंग्रेसचे नेते.
आम्हाला या राखीची आण आहे...काही झाले तरी फडणवीस यांची गर्जना...
आम्हाला या राखीची आण आहे...काही झाले तरी फडणवीस यांची गर्जना....
काही लोकांचा शौक असा की माझा...काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
काही लोकांचा शौक असा की माझा...काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो...पहिली झलक तर पहा...
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो...पहिली झलक तर पहा....
मोदी साहेबांनी मोठ्या मनांनी...शिंदे गटाच्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य
मोदी साहेबांनी मोठ्या मनांनी...शिंदे गटाच्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य.
इथून पुढे महापुरुषासंदर्भात असा प्रकार झाला...काय म्हणाले मनोज जरांगे
इथून पुढे महापुरुषासंदर्भात असा प्रकार झाला...काय म्हणाले मनोज जरांगे.
तानाजी सावंत यांनी मीडियाशी बोलणं टाळलं, आधी नको ते बोलून गेले अन् आता
तानाजी सावंत यांनी मीडियाशी बोलणं टाळलं, आधी नको ते बोलून गेले अन् आता.
'दोन महिन्यांनी ही वर्दी आम्हाला सलाम करेल अन् तुमची...', संजय राऊत या
'दोन महिन्यांनी ही वर्दी आम्हाला सलाम करेल अन् तुमची...', संजय राऊत या.