बीसीसीआय निवड समितीने श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. उभयसंघात टी20 आणि वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. टी 20 सीरिजमध्ये रोहित शर्मा निवृत्तीनंतर सुर्यकुमार यादव याला कर्णधार करण्यात आलं आहे. तर वनडे सीरिजसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचं कमबॅक झालं आहे. रोहित एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाची जबाबादारी सांभाळणार आहे. तर युवा शुबमन गिल याला लॉटरी लागली आहे.
बीसीसीआयने शुबमन गिलचं प्रमोशन केलं आहे. हार्दिक पंड्या आणि इतर दिग्गज खेळाडू असतानाही शुबमनला दोन्ही मालिकांसाठी टीम इंडियाचं उपकर्णधार करण्यात आलं आहे. शुबमनच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने झिंबाब्वे मोहिम पार पाडली. टीम इंडियाने ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर शुबमनला उपकर्णधारदाची धुरा देण्यात आली आहे.
शुबमनने टीम इंडियाचं 25 कसोटी, 44 वनडे आणि 19 टी20I सामन्यांमध्ये प्रतिनिध्तल केलं आहे. गिलने कसोटीत 4 शतकांसह 1 हजार 492 धावा केल्या आहेत. तसेच 44 वनडेमध्ये 6 शतकं आणि 13 अर्धशतकांच्या मदतीने 2 हजार 271 रन्स जोडल्या आहेत. तसेच एक द्विशतकाचा समावेश आहे. तर 1 शतक आणि 3 अर्धशतकांसह 19 टी20I सामन्यात शुबमनच्या नावे 505 धावा आहेत.
टी 20 सीरिज
पहिला सामना, 27 जुलै, संध्याकाळी 7 वाजता
दुसरा सामना, 28 जुलै, संध्याकाळी 7 वाजता
तिसरा सामना, 30 जुलै, संध्याकाळी 7 वाजता
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 2 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता
दुसरा सामना, 4 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता
तिसरा सामना, 7 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता
टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकप्तान), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.