SL vs IND: टीम इंडियाचं मिशन श्रीलंका, सामने टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येणार?
Sri Lanka vs India Live Streaming: टीम इंडिया गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनात श्रीलंके विरुद्ध टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. या मालिकेतील सामने कुठे पाहता येणार? जाणून घ्या.
टीम इंडियात आता नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. टीम इंडिया लवकरच श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात श्रीलंकेविरुद्ध टी20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. या दौऱ्याला 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच्या या दौऱ्यासह गौतम गंभीरच्या पर्वाला सुरुवात होणार आहे. राहुल द्रविड यांच्यानंतर गौतम गंभीर म्हणून श्रीलंका दौऱ्यापासून मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. टीम इंडिया श्रीलंके विरुद्ध 3-3 सामन्यांची टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे.
कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या तिघांची वनडे सीरिजमध्ये खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. टी 20 मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तसेच टीम इंडियाची घोषणा केव्हाही होऊ शकते. क्रिकेट चाहत्यांना या दौऱ्यासाठी कुणाला संधी मिळणार? याची प्रतिक्षा आहे. तसेच या दौऱ्यातील दोन्ही मालिका टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार? हे आपण जाणून घेऊयात.
थोडक्यात पण महत्त्वाचं टी 20 मालिकेचा श्रीगणेशा 27 जुलैपासून होणार आहे. तर दौऱ्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना हा 7 ऑगस्टला होणार आहे. दोन्ही मालिकेतील सामन्यांना भारतीय वेळेनुसार दुपारी आणि संध्याकाळी सुरुवात होणार आहे. दोन्ही मालिकेतील सामने हे पल्लेकेले आणि कोलंबो येथे होणार आहेत. वनडे सीरिजला 2 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. दुसरा सामना 4 आणि तिसरा सामना 7 ऑगस्ट रोजी होणार आहे.
टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक
UPDATE 🚨
A look at the revised schedule for #TeamIndia‘s upcoming tour of Sri Lanka #SLvIND pic.twitter.com/HLoTTorOV7
— BCCI (@BCCI) July 13, 2024
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया सामने कुठे पाहता येणार?
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20 आणि एकदिवसीय मालिकेतील सामने हे टीव्हीवर पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. दोन्ही मालिकेतील सामने हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील विविध चॅनेल्सवर पाहायला मिळतील. सोनी टेन 3 या चॅनेलवर हिंदीमध्ये कॉमेंट्रीचा आनंद घेता येईल. तर सोनी 5 चॅनेलवर इंग्रजीत कॉमेंट्री होणार आहे. तसेच मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे सामने पाहता येतील.