SL vs NZ : W,W,W, लॉकी फर्ग्यूसनचा तडाखा, श्रीलंकेविरुद्ध हॅटट्रिक, पाहा व्हीडिओ
Lockie Ferguson Hat Trick : लॉकी फर्ग्यूसन न्यूझीलंडसाठी टी 20i क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा पाचवा गोलंदाज ठरलाय. लॉकीने या हॅटट्रिकसह न्यूझीलंडच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्यूसन याने टी 20I क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केला आहे. रविवारी 10 नोव्हेंबरला श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामना दुसरा टी 20I सामना खेळवण्यात आला. न्यूझीलंडने हा सामना जिंकला. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. त्यामुळे न्यूजीलंड 108 धावांवर ऑलआऊट झाली. मात्र त्यानंतरही चिवट गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने या 108 धावांचा यशस्वी बचाव केला. न्यूझीलंडने हा सामना 5 धावांनी जिंकला. लॉकी फर्ग्यूसन याने या विजयात निर्णयायक भूमिका बजावली. लॉकीने 2 वेगवेगळ्या ओव्हरमध्ये सलग 3 बॉलमध्ये 3 विकेट्स घेतल्या.
लॉकी फर्ग्यूसनचा तडाखा
लॉकी फर्ग्यूसन याने श्रीलंकेच्या डावातील सहाव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कुसल परेरा याला बाद केलं. त्यानंतर लॉकीने आठव्या ओव्हरमधील पहिल्या आणि दुसऱ्या बॉलवर कामिंदु मेंडीस आणि कॅप्टन चरिथ असलंका या दोघांना आऊट केलं. लॉकीने कामिंदुला एलबीडब्ल्यू आऊट केलं. लॉकीने त्यानंतर दुसऱ्याच बॉलवर कॅप्टन चरीथ असलंका याला विकेटकीपरच्या हाती कॅच आऊट केलं आणि हॅटट्रिक पूर्ण केली.
लॉकी फर्ग्यूसन पाचवा गोलंदाज
लॉकी फर्ग्यूसन टी 20I क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा एकूण पाचवा गोलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडसाठी जेकब ओरम याने पहिल्यांदा टी 20Iमध्ये हॅटट्रिक घेण्याची कामगिरी केली होती. तसेच टीम साऊथी, मायकल ब्रेसवेल आणि मॅट हॅन्री यांनीही 3 बॉलमध्ये 3 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे लॉकी फर्ग्यूसन याची टी 20 क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेण्याची ही दुसरी वेळ ठरली. लॉकीने याआधी यॉर्कशायरकडून खेळताना इंग्लंडमध्ये ही कामगिरी केली होती.
लॉकी फर्ग्यूसनची हॅटट्रिक
Hat-trick! 🤯
Lockie Ferguson has just brought this game to life with a crazy couple of overs. 🔥#SLvNZonFanCode pic.twitter.com/8wcOpjpiLQ
— FanCode (@FanCode) November 10, 2024
सामन्याचा धावता आढावा
दरम्यान न्यूझीलंडचा डाव 108 धावांवर आटोपला. विल यंग याने 30 आणि जोश क्लार्कसेन याने 24 धावा केल्या. तर श्रीलंकेकडून हसरंका याने 4 आणि मथीशा पथिराणा याने 3 विकेट्स घेतल्या. मात्र प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव हा 103 धावांवर आटोपला. श्रीलंकेचा सलामी फलंदाज पाथुम निसांका याने 51 बॉलमध्ये 52 रन्स केल्या. मात्र इतर फलंदाज ढेर झाले आणि न्यूझीलंडने हा सामना जिंकला.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना आणि नुवान तुषारा.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), टिम रॉबिन्सन, विल यंग, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिच हे (विकेटकीपर), जोश क्लार्कसन, ईश सोधी, झकरी फौल्केस आणि लॉकी फर्ग्युसन.