SL vs NZ 2nd Test : श्रीलंका दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज, न्यूझीलंडविरुद्धचा सामना कुठे?

Sri Lanka vs New Zealand 2nd Test Live Streaming: श्रीलंका क्रिकेट टीम या 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. जाणून घ्या दुसरा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल.

SL vs NZ 2nd Test : श्रीलंका दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज, न्यूझीलंडविरुद्धचा सामना कुठे?
sri lanka and new zealand cricket teamImage Credit source: angelo mathews and blackcaps x account
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 1:01 AM

श्रीलंका मायदेशात न्यूझीलंड विरूद्धच्या 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे श्रीलंकेचा दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडला क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड क्रिकेट टीम विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडवण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे. धनंजया डी सिल्वा याच्याकडे श्रीलंकेच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर टीम साऊथी न्यूझीलंडचं कॅप्टन्सी करणार आहे. उभयसंघातील दुसरा सामना कुठे होणार? टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येणार? हे आपण जाणून घेऊयात.

श्रीलंकेने सलामीच्या सामन्यात 63 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात कामिंदु मेंडीस याने शतकी खेळी करत श्रीलंकेला 300 पार पोहचवलं. मात्र कामिंदुला दुसऱ्या डावात काही खास करता आलं नाही. तर न्यूझीलंडकडून टॉम लॅथमने पहिल्या डावात सर्वाधिक 70 धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात रचीन रवींद्र याने 92 धावांची खेळी करुन न्यूझीलंडच्या विजयाची आशा कायम ठेवली. मात्र रचीन आऊट होताच न्यूझीलंडने सामना गमावला. आता न्यूझीलंडचं लक्ष हे पहिल्या विजयाकडे असणार आहे.

श्रीलंका-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना केव्हा?

श्रीलंका-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना गुरुवारी 26 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे.

श्रीलंका-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना कुठे?

श्रीलंका-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहे.

श्रीलंका-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

श्रीलंका-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. तर 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

श्रीलंका-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

श्रीलंका-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर मॅच सोनी लिव्ह एपवर पाहता येईल.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडीस (विकेटकीपर), मिलन प्रियनाथ रथनायके, प्रभात जयसूर्या, निशान पेरिस आणि असिथा फर्नांडो.

कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघ : टीम साऊथी (कॅप्टन), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, एजाज पटेल, विल्यम ओर्रुके, मायकेल ब्रेसवेल, विल यंग, ​​मॅट हेन्री आणि बेन सियर्स.

बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?.
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी.
मुसळधार पावसाचा मध्य आणि पश्चिम रेल्वेला फटका, लोकल विस्कळीत
मुसळधार पावसाचा मध्य आणि पश्चिम रेल्वेला फटका, लोकल विस्कळीत.
'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?
'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?.
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?.
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल.
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं.
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक...
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक....
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान.