SL vs NZ : पंचांची एक चूक श्रीलंकेला भोवली! वनडे इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही
क्रिकेटमध्ये रोज नवे विक्रम प्रस्थापित होतात. काही मोडले जातात काही नव्याने रचले जातात. पण क्रिकेटमध्ये एखादी घटना पंचांच्या चुकीमुळे घडणं म्हणजे क्रीडाप्रेमींचा पारा चढण्यासारखं आहे. असंच काहीसं श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात घडलं.
मुंबई : वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये एक नियमावली आखली गेली आहे. या नियमांनुसार क्रिकेट खेळलं जातं. खासकरून गोलंदाजांनी किती षटकं टाकायची हे ठरलेलं असतं. वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाज 10 षटकं, तर टी20 क्रिकेटमध्ये गोलंदाज 4 षटकं टाकतो. पण श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड वुमन्स सामन्यात पंचांच्या चुकीमुळे पहिल्यांदाच वनडे इतिहासात अशी घटना घडली आहे. त्याचा फटका श्रीलंकेला बसला असंच म्हणावं लागेल.श्रीलंकेनं नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. 50 षटकात 7 गडी गमवून 329 धावा केल्या आणि विजयासाठी 330 धावांचं आव्हान दिलं.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात काय घडलं?
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जात आहे. पहिल्या वनडेत श्रीलंकेने न्यूझीलंडला पराभूत केलं होतं. त्यामुळे मालिकेत कमबॅकसाठी न्यूझीलंडने जोरदार तयारी केली होती. 330 धावा विजयासाठी दिल्यानंतर खास रणनितीनुसार खेळ सुरु होता.सामन्यात गोलंदाजाने 10 ऐवजी 11 षटकं टाकली. पंचांच्या चुकीमुळे ही असा प्रकार घडला आहे.
न्यूझीलंडची गोलंदाज ईडन कार्सन हीने दहा ऐवीजी 11 षटकं टाकली. श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात 45 व्या षटकापर्यंत तिने 10 षटकं पूर्ण केली होती. पण तिने त्यानंतरही एक षटक टाकलं. पंचांची आकडेमोड चुकल्याने त्यांनाही हा प्रकार लक्षात आला नाही. ईडन कार्सनने 11 षटकात 41 धावा देत 2 गडी बाद केले. 11 व्या षटकात तिने 1 धाव दिली आणि 5 चेंडू निर्धाव टाकले.
न्यूझीलंडने श्रीलंकेला या सामन्यात 111 धावांनी पराभूत केले. न्यूझीलंडने दिलेल्या 330 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 218 धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडच्या या विजयासह मालिकेत 1-1 ने बरोबरी झाली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 3 जुलै रोजी होणार आहे.
दोन्ही संघाचे खेळाडू
न्यूझीलंडचा संघ : सुझी बेट्स, बर्नाडाइन बेझुईडेनहॉउट (विकेटकीपर), अमेलिया केर, सोफी डेवाइन (कर्णधार), मॅडी ग्रीन,जॉर्जिया प्लिम्मर, ब्रूके हलिडे, हन्नाह रोव्ह, ली टाहूहू, इडेन कार्सन, फ्रान जोनस
श्रीलंकेचा संघ : विश्मी गुणरत्ने, हर्षिथा समाराविक्रमा, चामरी अट्टापट्टू, निलाक्षी डीसिल्वा, अनुष्खा संजीवनी, कविषा डिल्हारी, ओशाडी रनसिंगे, काव्या कविंडी, सुगंधीका कुमारी, उदेशिका प्रबोधनी, इनोका रणवीरा