SL vs NZ : तिसरा आणि अंतिम सामना, न्यूझीलंड शेवट गोड करणार?
Sri Lanka vs New Zealand 3rd odi Live Streaming : श्रीलंका क्रिकेट टीम चरिथ असलंका याच्या नेतृत्वात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे.
न्यूझीलंड क्रिकेट टीमने भारत दौऱ्यात इतिहास रचला. न्यूझीलंडने टॉम लॅथम याच्या नेतृत्वात टीम इंडियाला मायदेशात 3-0 अशा फरकाने लोळवत ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवला. मात्र त्यानंतर श्रीलंका दौऱ्यावर न्यूझीलंडची बत्ती गुल झाली. उभसंघातील 2 सामन्यांची टी 20i मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली. मात्र त्यानंतर श्रीलंकने न्यूझीलंडला एकदिवसीय मालिकेत पराभूत केलं. श्रीलंकेने सलग 2 सामने जिंकत 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने एकतर्फी आघाडी घेतली. आता श्रीलंकेकडे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात किंवींना पराभूत करत विजयी हॅटट्रिकसह क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड शेवटचा सामना जिंकून दौऱ्यांची सांगता करण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे.
चरिथ असलंका श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर मिचेल सँटनर याच्याकडे न्यूझीलंडच्या नेतृत्वाची जबाबदारी मिचेल सँटनर याच्याकडे आहे. श्रीलंकेने विजयी हॅटट्रिकसाठी जोरदार तयारी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडसमोर हा सामना जिंकून लाज राखण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे या अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
उभयसंघातील सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 2 वाजता टॉस होईल. हा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.तर लाईव्ह सामन्याचा थरार सोनी लिव्ह एपवरुन अनुभवता येईल. तसेच क्रिकेट चाहत्यांना फॅनकोडवरही श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना पाहता येईल.
श्रीलंका टीम : चरिथ असालंका (कर्णधार), लाहिरू उदारा (विकेटकीपर), अविष्का फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, सदीरा समराविक्रमा, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, महेश तीक्षाना, जेफ्री वेंडरसे, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका, कुशल परेरा, दुशन हेमंथा, निशान मधुष्का, मोहम्मद शिराज, चामिंडू विक्रमसिंघे आणि एशान मलिंगा.
न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, टिम रॉबिन्सन, हेन्री निकोल्स, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मिच हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, ईश सोधी, जेकब डफी, ॲडम मिल्ने, डीन फॉक्सक्रॉफ्ट, जॅकरी फॉल्केस आणि जोश क्लार्कसन.