SL vs NZ : न्यूझीलंडसाठी करो या मरोची लढाई, नाणेफेकीचा कौल श्रीलंकेने जिंकला आणि…

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेने जिंकला आहे. त्यामुळे श्रीलंकेची बाजू सुरक्षित असून न्यूझीलंडला मालिका ड्रॉ करण्याचं आव्हान आहे. दरम्यान, श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकला.

SL vs NZ : न्यूझीलंडसाठी करो या मरोची लढाई, नाणेफेकीचा कौल श्रीलंकेने जिंकला आणि...
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 7:25 PM

श्रीलंका आणि न्यूझीलंड दुसऱ्या टी20 मालिकेसाठी आमनेसामने आले आहेत. दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत श्रीलंकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवल्याने दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर दडपण आहे. न्यूझीलंडला मालिका ड्रॉ करण्यासाठी हा सामना काहीही करून जिंकावाच लागणार आहे. कारण ही सामना गमवला तर व्हाईट वॉश मिळणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडसाठी ही करो या मरोची लढाई आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला. मागच्या सामन्यात कौल गमवल्याने प्रथम गोलंदाजी करावी लागली होती. पण आता नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचाच निर्णय घेतला आहे. आता न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान आहे. “खेळपट्टीबाबत सांगायचं तर, खेळपट्टी कठीण दिसते आणि खाली भरपूर ओलावा आहे. ज्यामुळे फिरकीपटूंना मदत होऊ शकते आणि पहिल्या गेमपेक्षा हे चांगले खेळण्याची अपेक्षा करू शकते,” असे आमेर सोहेलचे म्हणणे आहे .

श्रीलंकेचा कर्णधार चरीथ असलंका याने सांगितलं की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. ही नवीन खेळपट्टी आहे आणि काल रात्री तिथे दव होते त्यामुळे ते मुख्य कारण आहे. आम्ही त्याच टीमसोबत खेळणार आहोत .’ न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने सांगितलं की, ‘खेळपट्टी दिसायला अगदी सारखीच आहे. कदाचित आम्हीही गोलंदाजी केली असती. काल एक चांगला धडा होता आणि आज काय होते ते आपण पाहू.’ दरम्यान, श्रीलंकेला पहिल्याच चेंडूवर यश मिळालं आहे. नुवान तुषाराच्या गोलंदाजीवर टीम रॉबिनसन गोल्डन डकवर गेला आहे. पहिल्या चेंडूवर नुवानने त्याचा त्रिफळा उडवला. यामुळे पहिल्या चेंडूपासूनच न्यूझीलंडवर दबाव वाढला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टिम रॉबिन्सन, विल यंग, ​​मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिच हे (विकेटकीपर), जोश क्लार्कसन, मिचेल सँटनर (कर्णधार), ईश सोधी, झकरी फौल्केस, लॉकी फर्ग्युसन.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका (कर्णधार), भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, नुवान थुशारा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.