SL vs PAK : सरफराज अहमद याच्या डोक्यावर आदळला चेंडू, तातडीने घ्यावा लागला असा निर्णय

क्रिकेट सामन्यात अनेकदा खेळाडूंना दुखपतींना सामोरं जावं लागतं. कधी कधी जीवही गमवावं लागतो. पाकिस्तानचा विकेटकीपर सरफराज अहमदच्या हेल्मेटवर चेंडू आदळला आणि अस्वस्थ झाला.

SL vs PAK : सरफराज अहमद याच्या डोक्यावर आदळला चेंडू, तातडीने घ्यावा लागला असा निर्णय
SL vs PAK : सरफराज अहमद डोक्यावर चेंडू लागल्याने झाला अस्वस्थ, शेवटी झालं असं की...
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 3:28 PM

मुंबई : क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना खेळाडू कसलीही पर्वा न करता सामोरं जातात. त्यामुळे अनेकदा दुखापतग्रस्त होतात. असे अनेक प्रसंग आतापर्यंत घडले आहेत. त्यामुळे खेळताना काही भान असणंही गरजेचं आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात कोलंबोमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात विकेटकीपर फलंदाज सरफराज अहमद दुखापतग्रस्त झाला. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडोची गोलंदाजी खेळताना चेंडू थेट हेल्मेटवर आदळला. चेंडूचा वेग इतका होता की, सरफराज अहमद मैदानात अस्वस्थ झाला. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मैदानात धाव घेत स्थितीचा आढावा घेतला.

मैदानात नेमकं काय झालं?

पाकिस्तानी इनिंगच्या 81 व्या षटका हा प्रकार घडला. चेंडू हेल्मेटला लागल्यानंतर पहिल्यांदा काही वाटलं नाही. पण पाच षटकानंतर म्हणजेच 86 व्या षटकात सरफराजला अस्वस्थ वाटू लागलं. षटक संपताच त्याने चक्कर असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्याने फिजियोला मैदानात बोलवलं. तपासणी आणि त्याच्याशी चर्चा केल्यानंतर मैदानाबाहेर गेला.

सरफराज अहमद रिटायर्ड हर्ट झाला तेव्हा त्याने 22 चेंडूत 14 धावा केल्या होत्या. असिथा फर्नांडो याच्या गोलंदाजीचा चौथा चेंडू हेल्मेटवर आदळला होता. या चेंडूवर पाकिस्तानला लेग बाय 4 धावा मिळाल्या होत्या. हा चेंडू लागूनही सरफराज मैदानात 5 षटकं तग राहून खेळला. पण त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले.

सरफराजच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागला चेंडू

हेल्मेटवर चेंडू लागल्यानंतर डोक्याच्या मागच्या बाजूला दुखापत झाली. उपचारासाठी सध्या सरफराज अहमद मैदानाबाहेर आहे. बरं वाटल्यानंतर पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तसं पाहिलं तर पाकिस्तानकडे टी ब्रेकपर्यंत 231 धावांचा लीड आहे. तसेच दुसराच दिवस असल्याने जिंकण्याच्या वेशीवर आहे असं म्हंटलं वावगं ठरणार नाही.

पाकिस्तानने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. ही मालिका पाकिस्तानने 2-0 ने जिंकल्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत जबरदस्त फायदा होणार आहे. तसेच भारताला पुढची स्पर्धा आणखी किचकट होणार आहे. कारण भारताचे पुढचे सामने दिग्गज संघांसोबत आहेत.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.