SL vs WI : श्रीलंकेला मालिका विजयाची संधी, विंडिजसाठी ‘करो या मरो’, कोण जिंकणार?

Sri Lanka vs West Indies 2nd Odi : श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील हा दुसरा सामना मालिकेच्या दृष्टीने निर्णायक असा आहे. या सामन्यानंतर मालिकेचं चित्र स्पष्ट होणार आहे.

SL vs WI : श्रीलंकेला मालिका विजयाची संधी, विंडिजसाठी 'करो या मरो', कोण जिंकणार?
Charith Asalanka and Shai Hope sl vs wi odi series 2024Image Credit source: Sri Lanka Cri cket x account
Follow us
| Updated on: Oct 23, 2024 | 1:19 AM

वेस्ट इंडिज क्रिकेट टीम सध्या श्रीलंका दौऱ्यात आहे. श्रीलंका विरुद्ध विंडिज यांच्यातील 3 सामन्यांची टी 20I मालिका यजमानांनी 2-1 ने जिंकली. त्यानंतर श्रीलंकेने एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी दिली. श्रीलंकेने पहिला सामना हा डीएलएसनुसार 5 विकेट्सने जिंकला. श्रीलंकेने या विजयासह 3 मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. आता या मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना हा बुधवारी 23 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे पल्लेकेले येथे करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 2 वाजता टॉस होईल. तसेच हा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल. तर मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर मॅच पाहता येईल.

विंडिजसाठी ‘करो या मरो’

श्रीलंका या मालिकेत आघाडीवर आहे. त्यामुळे श्रीलंककडे दुसऱ्या सामना जिंकण्यासह मालिका विजयाची दुहेरी संधी आहे. त्यामुळे यजमानांचा थेट मालिकेवर निशाणा असणार आहे. तर विंडिजकडे मालिकेत कमबॅक करण्याची ही शेवटची संधी आहे. त्यामुळे विंडिजसाठी हा आरपारचा सामना असणार आहे. अशात आता श्रीलंका टी 20I नंतर वनडे सीरिजही जिंकते की विंडिज बरोबरी साधते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

विंडिजचा दुसऱ्या सामन्याआधी सराव, लंकेला रोखणार?

श्रीलंका क्रिकेट टीम :  चरिथ असलंका (कॅप्टन), कुसल मेंडिस (विकेटकीपर), निशान मदुष्का, अविष्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, कामिंदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, जेफ्री वांडरसे, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराज, पाथुम निसांका, मोहम्मद निशांका, दिलशान मदुष्का, चामिंडू विक्रमसिंघे आणि महीश थीक्षाना.

वेस्ट इंडिज टीम : शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), अलिक अथानाझे, ब्रँडन किंग, केसी कार्टी, शेरफेन रदरफोर्ड, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, हेडन वॉल्श, जेडेन सील्स, एविन लुईस, मॅथ्यू फोर्ड, शामर जोसेफ आणि ज्वेल अँड्र्यूज.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.