SL vs WI : श्रीलंकेकडे विंडिजला क्लीन स्वीप करण्याची संधी, कोण जिंकणार तिसरा सामना?
Sri Lanka vs West Indies 3rd Odi : श्रीलंका 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे विंडिजसमोर तिसरा आणि अंतिम सामना जिंकत यजमानांना विजयी हॅटट्रिक करण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे.
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या वेस्ट इंडिज टीमला अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. उभयसंघात टी 20I मालिका पार पडली. श्रीलंकेने या 3 सामन्यांच्या मालिकेत विंडिजचा 3-0 ने धुव्वा उडवला. त्यानंतर श्रीलंकेने विंडिजला वनडे सीरिजमधील पहिल्या 2 सामन्यात लोळवलं. लंकेने यासह 3 सामन्यांची मालिका जिंकत 2-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे श्रीलंकेला तिसरा आणि अंतिम सामना जिंकून विंडिजला क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला विंडिज तिसरा सामना जिंकून दौऱ्याचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरेल. हा अंतिम सामना कधी आणि कुठे असणार? हे जाणून घेऊयात.
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामना कधी?
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामना शनिवारी 26 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे.
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामना कुठे?
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 2 वाजता टॉस होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवकरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर लाईव्ह मॅचचा थरार अनुभवता येईल.
कोण जिंकणार तिसरा सामना?
Sri Lanka take a 2-0 lead in the series with one more ODI to play on October 26.🌴🇱🇰 #SLvWI | #MenInMaroon pic.twitter.com/i1X4suEMBQ
— Windies Cricket (@windiescricket) October 23, 2024
श्रीलंका टीम : चरिथ असलंका (कॅप्टन), निशान मदुष्का, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, कामिंदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, महेश थेकशाना, असिथा फर्नांडो, मोहम्मद नियुम, जेफ्री, जेफरी शिराज, दिलशान मदुशंका आणि चामिंडू विक्रमसिंघे.
वेस्ट इंडिज टीम : शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), ब्रँडन किंग, ॲलिक अथानाझे, केसी कार्टी, शेरफेन रदरफोर्ड, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, हेडन वॉल्श, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी, जेडेन सील्स, एविन लुईस, मॅथ्यू फोर्ड आणि ज्युएल अँड्र्यू.